निवडणुकीसाठी 'जोडी तुझी-माझी' !

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना ५० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय शरद पवार यांच्या प्रेरणेतून झाल्याचा गवगवा राष्ट्रवादी काँग्रेस नेहमीच करते. पण त्यांच्याच पक्षातले स्थानिक नेते या निर्णयाचा उपयोग करत मनपा निवडणुकांचं तिकीट घरातच रहावं यासाठी कसे प्रयत्नशील आहेत.

Updated: Jan 22, 2012, 09:07 AM IST

कैलास पुरी, www.24taas.com, पुणे

 

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना ५० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय शरद पवार यांच्या प्रेरणेतून झाल्याचा गवगवा राष्ट्रवादी काँग्रेस नेहमीच करते. पण त्यांच्याच पक्षातले स्थानिक नेते या निर्णयाचा उपयोग करत मनपा निवडणुकांचं तिकीट घरातच रहावं यासाठी कसे प्रयत्नशील आहेत. हे पिंपरी-चिंचवडमध्ये समोर आलं आहे.

 

अमर कापसे आणि पूनम अमर कापसे या जोडीने पिंपरी-चिंचवडच्या अशोक थिएटर प्रभागातल्या अ आणि ब या दोन वॉर्डामध्ये दोघांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून महापालिका निवडणुकांसाठी तिकीट मागितलं आहे. पुरुष विभागातून नवऱ्यानं तर महिला विभागातून पत्नीनं तिकीट मागितलं आहे. कुणालाही तिकीट मिळालं तरी सत्तेच्या चाव्या घरातच रहाव्या या हेतूनं तब्बल १६ जोडप्यांनी हीच युक्ती वापरत दादांकडे तिकीटांची मागणी केली आहे. पण इच्छुक जोडप्यांना मात्र त्यात काहीच गैर वाटत नाही.

 

तर दुसरीकडे पतीच्या हातातलं बाहुलं म्हणून काम करणार नाही असा दावा पत्नीनं केला आहे. अमर आणि पूनम कापसेंसोबतच आणखी १६ जणांनी उमेदवारी मिळविण्यासाठी अजितदादांना साकडं घातलं आहे. त्यामुळं साहजिकच महिलांना आरक्षण यापुढे चाव्या म्हणून की सत्तेच्या चाव्या घरात रहाव्या यासाठी आहे असा प्रश्न निर्माण झाला आहे.