नोकरीचे आमिष दाखवून विद्यार्थ्यांची फसवणूक

कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात नोकरी देण्याचे आमीष दाखवून 25 विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. सुजीत पाटील यानं या युवकांची फसवणूक केलीय.

Updated: Apr 19, 2012, 07:49 PM IST

www.24taas.com, कोल्हापूर

कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात नोकरी देण्याचे आमीष दाखवून 25 विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. सुजीत पाटील यानं या युवकांची फसवणूक केलीय.

विद्यापीठातले अधिकारी ओळखीचे असून शिपाई आणि क्लार्कची नोकरीचे आश्वासन देऊन त्यानं तब्बल 35 लाख रुपये जमा केलेत. विशेष म्हणजे ही फसवणूक करताना त्यानं कुलगुरुंची बनावट सही आणि शिक्काही तयार केला होता. अखेरच्या क्षणापर्यंत नोकरीची ऑर्डर हाती देऊ अशी बतावणी तो करत होता. याबाबत भ्रष्टाचार विरोधी संघटनेनं कुलगुरुंची भेट घेऊन या गंभीर प्रकाराची माहिती दिली.

कुलगुरुंनीही त्याची दखल घेत याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केलीय. दरम्यान विद्यापीठातली नोकरभरती पारदर्शक असून कोणीही कोणत्याही प्रलोभनांना बळी पडू नये असं आवाहन कुलगुरुंनी केलंय.