राज सरांपुढे तोंडी परीक्षा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्याकडे लक्ष वळवलं आहे, पुण्यात देखील लेखी परीक्षा झाली होती. आज राज ठाकरे यांनी लेखी परीक्षेतील उमेदवारांची तोंडीपरीक्षा घेण्यास सुरवात केली आहे.

Updated: Jan 10, 2012, 05:32 PM IST

www.24taas.com, पुणे

 

मनसेच्या महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारांना लेखी परीक्षा घेतली गेली होती, या लेखी परीक्षेची गेल्या काही दिवसात खूप चर्चा झाली होती, मुंबईत लेखी परीक्षा आणि मुलाखत पूर्ण झाल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्याकडे लक्ष वळवलं आहे, पुण्यात देखील लेखी परीक्षा झाली होती. आज राज ठाकरे यांनी लेखी परीक्षेतील उमेदवारांची तोंडीपरीक्षा घेण्यास सुरवात केली आहे.

 

तर पुण्यात दुसरीकडे जिल्हा परिषदाच्या इच्छुक उमेदवरांसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुलाखतीला सुरवात केली आहे. त्यामुळे पुण्यात एकाच दिवशी या दोन दिग्गज नेत्यांनी उमेदवारांची परीक्षा घेतल्याने पुन्हा एकदा या परीक्षेबाबत चर्चा सुरू आहे. पुण्यात राज आणि अजित मास्तरांच्या शाळा सुरू झाल्या आहेत. दोघांनीही इच्छुक उमेदवारांच्या तोंडी परीक्षा घ्यायला सुरुवात केली आहे.

 

मनसेची मुंबईतली उमेदवार निवडीसाठीची मुलाखत प्रक्रिया पूर्ण झाली होती. त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पुण्याला रवाना झाले आहेत, दहा ते पंधरा जानेवारी दरम्यान पुणे आणि नाशिकमध्ये उमेदवारांच्या मुलाखती होणार होत्या, त्यातील पुण्याच्या मुलाखती आज घेतल्या. तर ठाण्यामध्ये १७ आणि १८ जानेवारीला मुलाखती होतील. २० तारखेनंतर मनसेची पहिली यादी अपेक्षित आहे. मनसेच्या उमेदवारीसाठी इच्छुकांची परीक्षा झाली होती. त्यामुळे सुरुवातीपासूनच मनसेची उमेदवार निवड प्रक्रिया उत्सुकतेची ठरली होती. आधी लेखी परीक्षा, मग मुलाखत आणि त्यानंतर राज ठाकरे उमेदवार निश्चित करणार आहेत.