लवासाविरोधात फौजदारी खटला

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने लवासाविरोधात पुणे जिल्हा कोर्टात फौजदारी खटला दाखल करण्यात आला आहे. या कारवाईला राज्य सरकार तसेच मुख्यमंत्र्याकडूनही यापूर्वीचे हिरवा कंदील मिळाला होता.

Updated: Nov 4, 2011, 04:22 PM IST

झी २४ तास वेब टीम, पुणे

 

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने लवासाविरोधात पुणे जिल्हा कोर्टात फौजदारी खटला दाखल करण्यात आला आहे. या कारवाईला राज्य सरकार तसेच मुख्यमंत्र्याकडूनही यापूर्वीचे हिरवा कंदील मिळाला होता. तसेच राज्य सरकारने लवासा विरोधात चार नोव्हेंबरपर्यंत कारवाई करावी, असा आदेश मुंबई कोर्टाने दिला होता.

 

फौजदारी खटला दाखल लवासाचे प्रमुख अजित गुलाबचंद यांच्यासह चार अधिकारी आणि इतर दहा जणांचा यात समावेश आहे. प्रकल्पाची उभारणी करताना प्रदूषण नियंत्रण मंडळाची परवानगी न घेतल्यामुळे आणि पर्यावरण नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.

 

लवासाचे इतर अधिकाऱ्यांविरोधातही फौजदारी खटले दाखल करण्यात आले आहेत. मुख्य न्यायदंडाधिकारी एन.टी.घाडगे यांच्या न्यायालायात खटला दाखल झाला आहे. हायकोर्टानं दिलेल्या आदेशावर अखेरच्या दिवशी सरकारनं हे पाऊल उचललं.

 

लवासा संचालक मंडळातील अजित गुलाबचंद, अंबुजा जैन, एस पी पंधरकर, कुणाल मेघाणी, अनिरुद्ध देशपांडे, अनुराधा देसाई, विठ्ठल मणियार, ज्ञानदेव घोरप़डे, गौतम थापर, एस नारायण  यांच्यावर खटला दाखल झाला.