साताऱ्यात हॉरर किलिंग

पुरोगामी महाराष्ट्राच्या पुरोगामी प्रतिमेला काळीमा फासणारी धक्कादायक बातमी...मुख्यमंत्र्यांच्या साता-या जिल्ह्यात हॉरर किलिंगची खळबळजनक घटना घडली. उच्चशिक्षित मुलीची पित्यानं निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे..

Updated: Feb 20, 2012, 11:37 PM IST

www.24taas.com, सातारा

 

पुरोगामी महाराष्ट्राच्या पुरोगामी प्रतिमेला काळीमा फासणारी धक्कादायक बातमी...मुख्यमंत्र्यांच्या साता-या जिल्ह्यात हॉरर किलिंगची खळबळजनक घटना घडली. उच्चशिक्षित मुलीची पित्यानं निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे..

 

सातारा जिल्ह्यातल्या औंधमध्ये एका पित्यानं उच्चशिक्षित मुलीची निर्घूण हत्या केल्यानं चांगलीच खळबळ उडालीए. समाजातल्या मुलाशी लग्न करण्यास नकार दिल्यानं शंकर शिंदेंनी त्यांची मुलगी आशा हिच्या डोक्यात लोखंडी दांडा घालून हत्या निर्घृण हत्या केली. बीएससी आणि एमएसडब्ल्यू पर्यंत शिक्षण पूर्ण केलेल्या आशाला आंतरजातीय विवाह करायचा होता. मात्र घरच्यांचा तिच्या लग्नाला विरोध होता.

 

आशानं आपल्या जातीतच लग्न करावं यासाठी तिच्या वडलांनी तिच्यावर दबाव आणला होता. मात्र आशा जुमानत नाही असं लक्षात येताच डाव साधत शंकर शिंदे यानं आपल्या मुलीचीच निर्घृण हत्या केली.पित्याच्या या कृत्याचा सर्वच स्तरातून निषेध व्यक्त केला जातोय.

 

केवळ सामाजिक प्रतिष्ठा जपण्यासाठी पित्यानं मुलीची हत्या केली. मात्र, पुरोगामी महाराष्ट्रात 21 व्या शतकातही जातीधर्माचा किती जबरदस्त पडदा आहे हे साता-यातल्या या घटनेवरून अधोरेखित होतं.

 

[jwplayer mediaid="51950"]

 

 

Tags: