सोनिया -अण्णांमध्ये खडाजंगी

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि अण्णा हजारे यांच्यात लोकपाल बिलावरुन पुन्हा खडाजंगी सुरू झालीय. केवळ भाषणबाजी करुन भ्रष्टाचार संपणार नाही या सोनियांच्या टीकेला अण्णा हजारेंनी उत्तर दिलंय. ही भाषणबाजी नसून जनतेची मागणी आहे.

Updated: Nov 9, 2011, 01:07 PM IST

झी २४ तास वेब टीम, राळेगणसिद्धी

 

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि अण्णा हजारे यांच्यात लोकपाल बिलावरुन पुन्हा खडाजंगी सुरू झालीय. केवळ भाषणबाजी करुन भ्रष्टाचार संपणार नाही या सोनियांच्या टीकेला अण्णा हजारेंनी उत्तर दिलंय. ही भाषणबाजी नसून जनतेची मागणी आहे. सरकार मोठं आहे, मी केवळ फकीर असून सरकावर काय दबाव आणणार असा टोला अण्णांनी सोनियांना लगावलाय.

 

केवळ भाषणांनी भ्रष्टाचार संपणार नाही, या शब्दात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी अण्णा हजारेंवर टीकास्त्र सोडलं होतं. लोकपालच्या मुद्दयावर सोनियांनी पहिल्यांदाच मौन सोडून जाहीर प्रतिक्रिया दिली होती. सक्षम लोकपाल बिलाबाबत पंतपर्धान डॉ. मनमोहन सिंग यांनी आश्वासन दिलं आहे, मात्र तरीही ओरड का होते आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला होता. लोकपालवरुन टीम अण्णा सरकारवर सतत करत असलेल्या टीकेचा सोनियांनी चांगलाच समाचार घेतला होता. उत्तराखंडमध्ये एका उद्घाटनाच्या कार्यक्रमात सोनियांचे भाषण वाचून दाखवण्यात आले, या भाषणात त्यांनी टीम अण्णावर कोरडे ओढले होते..

 

Tags: