नाफेड घोटाळा प्रकरणी संचालकांवर कारवाईचा बडगा

Updated: Dec 6, 2011, 06:38 PM IST

झी 24 ताससाठी नाशिकहून योगेश खरे

 

नाफेडमध्ये पंधराशे कोटी रुपयांचा घोटाळा करणा-या तत्कालिन  संचालक मंडळा विरोधात कारवाईचा बडगा उगारण्यात आलाय. या घोटाळ्याप्रकरणी 16 कोटी रुपये भरण्याची नोटीस तत्कालिन उपाध्यक्ष चांगदेव होळकर यांना बजावण्यात आलीये. तर नाफेडच्या तत्कालिन संचालकांनी 3 हजार 800 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप सामाजिक संघटनांकडून केला जात आहे

 

नाफेडचे संचालक असलेल्या चांगदेवराव होळकरांना पंधरा कोटी रुपये भरण्याची नोटीस बजावण्यात आलीय. सन 2003 ते 2005 मध्ये झालेल्या पंधराशे कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी ही नोटीस बजावण्यात आलीये. तत्कालिन उपाध्यक्ष असलेल्या होळकर आणि त्यांच्या संचालक मंडळानं विनातारण पंधराशे कोटींचं दिलेलं कर्ज बुडित निघालयं. त्यामुळं नाफेड तोट्यात आहे. हे नुकसान भरुन काढण्यासाठी तत्कालिन दोन अध्यक्षांना प्रत्येकी 64 कोटी तर आग्र्याच्या आयकर आयुक्तांना 167 कोटी रुपये वसुलीची नोटीस बजावण्यात आली आहे.

 

नाफेडच्या तत्कालिन संचालक मंडळाच्या काळात 3800 कोटी रुपयांचे घोटाळे झालेत. त्यामुळं या सर्व व्यवहारांची चौकशी करण्याची मागणी होऊ लागली आहे. संचालक मंडळाच्या चुकीच्या निर्णायामुळं नाफेडला मोठा आर्थिक फटका बसलाय. त्यामुळं विशिष्ट हेतूनं चुकीचे निर्णय घेणा-यांवर जरब बसेल अशी कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.