'आकाशा'त परत भरारी मारण्याची संधी

आकाश टॅबलेटचं बुकिंग करण्याची संधी ज्यांनी गमावली त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. डाटाविंड कंपनीने १५ डिसेंबरला aakashtablet.com या संकेतस्थाळवर आकाशसाठी ऑनलाईन बुकिंगची सूविधा उपलब्ध करुन दिली होती. आता ज्यांना त्यावेळेस या संधीचा लाभ घेता आला नव्हता त्यांना NCarry.com. या संकेतस्थळावर बुकिंग करता येणार आहे.

Updated: Dec 26, 2011, 03:28 PM IST

झी २४ तास वेब टीम, मुंबई

 

आकाश टॅबलेटचं बुकिंग करण्याची संधी ज्यांनी गमावली  त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. डाटाविंड कंपनीने १५  डिसेंबरला  aakashtablet.com या संकेतस्थाळवर  आकाशसाठी ऑनलाईन बुकिंगची सूविधा उपलब्ध करुन दिली  होती. आता ज्यांना त्यावेळेस या संधीचा लाभ घेता आला  नव्हता त्यांना  NCarry.com. या संकेतस्थळावर बुकिंग करता  येणार आहे.  NCarry.com या ऑनलाईन शॉपिंग साईटने  आकाश टॅबलेटसाठी बुकिंग सुरु केलं आहे. ऑनलाईन पेमंट  करणाऱ्यांना प्राधान्यक्रम देण्यात येणार असल्याचं या  ऑनलाईन साईटने म्हटलं आहे.

 

आकाश या एँड्रॉईड टॅबलेटची किंमत आहे २४९९ रुपये आणि पाठवण्याचा खर्च १९९ रुपये अधिक आकारण्यात येतो. टॅबलेटच्या डिलिव्हरीच्या वेळेस काही ग्राहकांना रोख रकमेने पेमंट करण्याचा पर्यायही उपलब्ध करुन देण्यात येईल असं वृत्त आहे. आकाश टॅबलेटमध्ये सात इंच स्क्रीन तसंच २५६ मेगाबाईट रॅम आणि एआरएम ११ प्रोसेसरसह एँड्रॉईड २.२ ऑपरेटिंग सिस्टिम तसंच दोन युएस पोर्ट्स आणि एचडी क्वालिटी व्हिडिओ हे फिचर्स आहेत. सध्याच्या आकाशची बॅटरीचं आयुष्य दीड तास इतकं आहे.