कोलाहलात झोपणाऱ्यांना पडतात चांगली स्वप्नं

जर तुमच्या आजूबाजूला गडबड गोंधळ आणि कोलाहल माजला असेल आणि त्यामुळे तुमची झोपमोड होत असेल, तर पुन्हा विचार करा. नुकत्याच एका संशोधनातून समोर आलंय की कोलाहलामध्ये शांत झोपणाऱ्या व्यक्तींना सकारात्मक स्वप्नं पडतात.

Updated: Jun 17, 2012, 05:02 PM IST

www.24taas.com, लंडन

जर तुमच्या आजूबाजूला गडबड गोंधळ आणि कोलाहल माजला असेल आणि त्यामुळे तुमची झोपमोड होत असेल, तर पुन्हा विचार करा. नुकत्याच एका संशोधनातून समोर आलंय की कोलाहलामध्ये शांत झोपणाऱ्या व्यक्तींना सकारात्मक स्वप्नं पडतात.

शास्त्रज्ञांचं असं म्हणणं आहे की जे लोक कोलाहलात शांतपणे झोपतात, त्यांना नेहमी चांगली आणि सकारात्मक शक्ती देणारी स्वप्नं पडतात. आसपास लोकांचा गोंधळ असेल, वाहनांचा गजबजाट असेल, तर अशा वातावरणात झोपलेल्या व्यक्तीला चांगली स्वप्न पडतात.

डेली मेल या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार या अभ्यासासाठी शास्त्रज्ञांनी ८,००० लोकांचा अभ्यास केला. या अभ्यासातून त्यांच्या लक्षात आलं की शांत वातावरणात झोपणाऱ्या लोकांना पडणाऱ्या नकारात्मक स्वप्नांच्या तुलनेत गजबजाटात झोपणाऱ्या व्यक्तींना पडणाऱ्या दुःस्वप्नांची संख्या २०% कमी असते.