फेसबुकवरील फोटोमुळे हंगामा, तोडफोड-बंद

फेसबुकवर आपत्तीजनक फोटो अपलोड केल्याने नाराज झालेल्या एका गटाने मेरठमध्ये गैरवर्तणूक करण्यास केली होती. शहरातील घंटाघर भागात एसीपी कार्यालय समोर निदर्शन केले.

Updated: Jun 19, 2012, 11:22 AM IST

www.24taas.com, मेरठ

 

फेसबुकवर आपत्तीजनक फोटो अपलोड केल्याने नाराज झालेल्या एका गटाने मेरठमध्ये गैरवर्तणूक करण्यास केली होती. शहरातील घंटाघर भागात एसीपी कार्यालय समोर निदर्शन केले. निर्दशनच्या दरम्यान काही दुकानांची तोडफोड देखील केली. त्यामुळे बाजरपेठ बंद करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.

 

पोलिसांच्या माहितीनुसार कोणीतरी अज्ञात व्यक्तीने फेसबुकवर एका धार्मिक संप्रदायाशि नि़गडीत काही आपत्तिजनक असे फोटो अपलोड केले होते. आणि त्यामुळेच त्या संप्रदायामधील लोक बिथरले. मात्र त्यानंतर हे आपत्तिजनक फोटो फेसबुकवरून काढण्यात आले.

 

पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला आहे. पोलिसांनी सांगितले आहे की, हे फोटो कुठून अपलोड करण्यात आले होते यांची माहिती मिळाली आहे. सायबर क्राईमच्या अंतर्गत संबंधित लोकांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.