मिनिटामध्ये तयार मॅगी नव्हे मोबाईलची बॅटरी

Updated: Nov 18, 2011, 12:39 PM IST

झी २४ वेब टीम, मुंबई

 

एक आठवड्यापेक्षा अधिक काळ चालणारी आणि पंधरा मिनिटात चार्ज होणारी सेल फोनची बॅटरी विकसीत करण्यात लवकरच शास्त्रज्ञांना यश येण्याची शक्यता हे. नॉर्थवेस्टर्न विद्यापीठातील अभियंत्यांनी लिथियम आयन बँटरीसाठी इलेक्ट्रोडची निर्मिती केली आहे.

सध्या उपलब्ध असलेल्या तंत्रज्ञानाच्या तुलनेट दहा पट चार्ज होण्याची क्षमता त्यात आहे. या नव्या इलेक्ट्रोडमुळे बॅटरी १० पट वेगाने चार्ज होत असल्याचं ऍडवान्सड एनर्जी मटेरियल्स जर्नलने म्हटलं आहे. तसंच नव्या लिथियम आयन बँटरीचे चार्जिंगचे आयुष्यही दहा पटी वाढवता येत असल्याचं विद्यापीठातील संशोधक हारोल्ड एच.कुग यांनी एका निवेदनात म्हटलं हे.

ही नवी बॅटरी १५० वेळा चार्ज केल्यानंतरही सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या बॅटरीच्या तुलनेत पाच पट अधिक प्रभावी असल्याचं कुंग यांचे म्हणणं आहे. सेल फोन आणि आयपॉड व्यतिरिक्त या नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग इलेक्ट्रिक कारसाठीच्या छोट्या आणि अधिक कार्यक्षम बँटरी निर्मितीसाठी होईल. संशोधकांच्या मते येत्या तीन ते पाच वर्षात हे तंत्रज्ञान बाजारात उपलब्ध होईल.

Tags: