गरोदर महिलांनो जरा जपूनच...

प्रत्येक गरोदर स्त्रीला आपल्या गर्भात वाढ होणाऱ्या बाळाबाबत फारच कुतूहल असतं. तो गर्भ म्हणजे तिचा जीव की प्राण असतो. पण याच गर्भाची काळजी घेताना मात्र जरा जपून. गर्भवतीने घेतलेली औषधे तिच्या पोटातील गर्भापर्यंत पोहोचण्याचा मार्ग म्हणजे नाळ.

Updated: Mar 19, 2012, 01:15 PM IST

झी २४ तास वेब टीम

 

प्रत्येक गरोदर स्त्रीला आपल्या गर्भात वाढ होणाऱ्या बाळाबाबत फारच कुतूहल असतं. तो गर्भ म्हणजे तिचा जीव की प्राण असतो. पण याच गर्भाची काळजी घेताना मात्र जरा जपून. गर्भवतीने घेतलेली औषधे तिच्या पोटातील गर्भापर्यंत पोहोचण्याचा मार्ग म्हणजे नाळ. गर्भाच्या वाढीसाठी आणि पोषणासाठी गरजेचा असलेला प्राणवायू आणि इतर पोषकद्रव्ये ह्या नाळेमार्फतच गर्भापर्यंत पोहोचवली जातात. त्यामुळे गर्भवतीने घेतलेल्या औषधांचे विविध परिणाम गर्भावर होऊ शकतात.

 

गर्भावर थेट नुकसान, अनैसर्गिक वाढ इ. (ह्यांमुळे बाळात जन्मतःच दोष असू शकतात) किंवा मृत्यू देखील होऊ शकतो. नाळेच्या कामात बदल होणे किंवा अडथळा येणे. नाळेतील रक्तवाहिन्या अरुंद झाल्याने आईकडून गर्भाला होणारा प्राणवायूचा आणि इतर पोषकद्रव्यांचा पुरवठा कमी होतो. परिणामी बाळाचे वजन कमी असू शकते किंवा ते अविकसित असू शकते. कधीकधी गर्भाशयांच्या स्नायूंचे जोरदार आकुंचन होऊन गर्भाला होणारा रक्तपुरवठा कमी होतो व त्याचे अप्रत्यक्ष नुकसान होते. गर्भधारणेच्या अगदी सुरुवातीला म्हणजे फलनानंतर २० दिवसांत घेतलेली काही औषधे गर्भ नष्टही करू शकतात. परंतु फलनानंतरच्या तिसऱ्या आठवड्यापासून आठव्या आठवड्यापर्यंतचा गर्भ जन्मजात व्यांगांना बळी पडू शकतो. ह्या काळात गर्भापर्यंत पोहोचलेल्या औषधांमुळे एकतर गर्भावर काहीही परिणाम होत नाही किंवा चक्क गर्भपातच होऊ शकतो!

 

काही औषधे अतिशय विषारी असतात व गर्भवतींनी ती कधीही घेऊ नयेत कारण त्यांमुळे जन्माला येणार्याष बाळामध्ये गंभीर व्यंगे उद्भवू शकतात – उदा. थॅलिडोमाइड (थॅलोमिड). बऱ्याच दशकांपूर्वी गर्भवती हे औषध घेत असत परंतु ह्याचा दिसून आलेला दुष्परिणाम म्हणजे जन्माला येणार्याव मुलांचे हातपायांची वाढच झालेली नसायची. तसेच त्यांच्या आतड्यांमध्ये, हृदयात आणि रक्तवाहिन्यांमध्ये गंभीर दोष असायचे. काही औषधांची प्राण्यांवर चाचणी केली असता त्यांच्या गर्भांमध्ये दोष आढळले परंतु मानवी गर्भांवर तेच दुष्परिणाम झालेले आढळले नाहीत – उदा. मेक्लिझिन (उर्फ ऍँटिव्हर्ट) हे औषध बरेचदा उलट्या, गाडी लागणे, मळमळणे ह्यांवर घेतले जाते. त्यामुळे गर्भवती स्त्रियांनो जरा संभाळूनच.