लंडन- धूम्रपान करणाऱ्या महिलांनो,सावधान!सिगरेट ओढण्यामुळे मेनोपॉझ एक वर्ष आधीच येऊ शकतो.सिगरेट पिण्यामुळे हाडांच्या आणि हृदयाच्या विकारांव्यतिरिक्त महिलांची मासिक पाळीही वेळेआधीच बंद होऊ शकते. असं मत डेली मेलने नोंदवलं आहे.
यासाठी करण्यात येणाऱ्या अभ्यास आधीच्या अभ्यासातले आकडेही जमेस धरले होते. यात अमेरिका, पोलंड, तुर्कस्तान आणि इराणमधील ६००० महिलांचा अभ्यास केला गेला. सिगरेट न ओढणाऱ्या महिलांची मासिक पाळी वयाच्या सरासरी ४६ ते ५१ या वयात थांबते. मात्र दोन शोध सोडले तर, इतर सर्व संशोधनांतून असा निष्कर्ष निघाला की सिगरेट ओढणाऱ्या महिलांमध्ये मात्र ४३ ते ५० या वयात मेनोपॉझ येतो.
या अभ्यासविषयाचे प्रमुख अभ्यासक वाल्दिमीर व्होरनिक म्हणाले,"आमच्या अभ्यासाचे निष्कर्षही हेच शाबित करतात की धूम्रपान केल्याने लवकर मेनोपॉझ येतो.म्हणूनच, महिलांनी धूम्रपान करू नये. (एजन्सी)