क्रोएशियाची आघाडी कायम...

इटली विरूद्ध क्रोएशिया मॅच १-१ ने बरोबरीत सुटली आणि कोएशिएन फॅन्सनी स्टेडियममध्ये जल्लोष केला. आयर्लंडविरूद्ध हिरो ठरलेल्या मांझुकेसने इटलीविरूद्ध गोल झळकावताना क्रोएशियाला बरोबरी साधून दिली. त्यामुळे इटलीला सलग दुस-या मॅचमध्ये ड्रॉ वर समाधान मानावं लागलं असून क्रोएशियाने पॉईंट टेबलमध्ये टॉप पोझिशन मिळवलीय.

Updated: Jun 15, 2012, 07:29 AM IST

www.24taas.com, पोजनान

इटली विरूद्ध क्रोएशिया मॅच १-१ ने बरोबरीत सुटली आणि कोएशिएन फॅन्सनी स्टेडियममध्ये जल्लोष केला. आयर्लंडविरूद्ध हिरो ठरलेल्या मांझुकेसने इटलीविरूद्ध गोल झळकावताना क्रोएशियाला बरोबरी साधून दिली. त्यामुळे इटलीला सलग दुस-या मॅचमध्ये ड्रॉ वर समाधान मानावं लागलं असून क्रोएशियाने पॉईंट टेबलमध्ये टॉप पोझिशन मिळवलीय.

पोलंडच्या पोंझनान येथे झालेल्या ग्रुप सी युरो कपच्या मॅचमध्ये क्रोएशियाच्या मांझुकेसने केलेल्या गोलमुळे इटलीला ड्रॉ वर समाधान मानावं लागलं. या बरोबरीमुळे पॉईंट टेबलमध्ये क्रोएशियाने आघाडी कायम राखली असून इटलीच्या झोळीत सलग दुस-या ड्रॉची भर पडली आहे. आंद्रे पिर्लोने ३९ व्या मिनिटाला फ्रिकीकवर इटलीकरता स्टनिंग गोल करून देत १-० ने आघाडी मिळवून दिली. मात्र, मारिओ मांझुकेसने सेकंड हाफमध्ये  क्रोएशियाकरता गोल केला आणि इटलीच्या आनंदावर विरजण पडलं. या बरोबरीसह क्रोएशिया क्वार्टर फायनलच्या आणखी एक पाऊल जवळ गेले आहेत. तर इटली अजूनही विजयाच्या प्रतिक्षेत आहे. आंद्रे पिर्लोने केलेल्या फ्रिकीकवरील गोलमुळे इटलीला आघाडी मिळाली. पिर्लोच्या या फ्रिकीकवरील गोलने २००६ फुटबॉल वर्ल्ड कपमधील आठवणींना उजाळा मिळाला.

इटली युरो कप मधील पहिल्या विजयाची नोंद करणार असं वाटत असतानाच मांझुकेसने इटलीच्या विजयाचे मनसुबे उधळून लावले. याआधी झालेल्या लीग मॅचमध्ये इटलीला वर्ल्ड चॅम्पियन स्पेनविरूद्धही बरोबरीत समाधान मानावं लागलं होतं. फर्स्ट हाफमध्ये इटलीच्या आक्रमणाला क्रोएशियन गोलकीपर प्लेटिकोसाने आवर घातला आणि इटलीच्या गोल करण्याच्या दोन संधींना सुरूंग लावला. याआधी क्रोएशियाने पहिल्या मॅचमध्ये आयर्लंडचा ३-१ ने धुव्वा उडवला होता. पॉईंट टेबलमध्ये टॉपवर असणा-या क्रोएशियाची पुढची मॅच होणार आहे ती युरो चॅम्पियन स्पेनशी तर इटली दुबळ्या आयर्लंडविरूद्ध लीगमधील पहिल्या विजयाची नोंद करण्यासाठी आतूर असणार आहे.

.