जर्मनी-इटलीमध्ये आज दुसरी सेमी फायनल

विजयाची प्रबळ दावेदारी मानली जाणारी जर्मनी आणि इटलीमध्ये दुसरी सेमी फायनल रंगणार आहे. आता सर्वाधिक वेळा युरो कपचे विजेतपद पटकावलेली जर्मनी की याआधी जर्मनीला सर्वाधिक वेळा पराभूत करणारी इटली फायनल गाठते हे पाहण रंजक ठरणार आहे.

Updated: Jun 28, 2012, 11:25 AM IST

www.24taa.com, वार्सा

 

विजयाची प्रबळ दावेदारी मानली जाणारी जर्मनी आणि इटलीमध्ये दुसरी सेमी फायनल रंगणार आहे. आता सर्वाधिक वेळा युरो कपचे विजेतपद पटकावलेली जर्मनी की याआधी जर्मनीला सर्वाधिक वेळा पराभूत करणारी इटली फायनल गाठते हे पाहण रंजक ठरणार आहे.

 

युरो कपमधील दुसरी सेमी फायनल रंगणार आहे ती सर्वाधिक 3 वेळा युरो कपचे विजेतेपद पटकावलेल्या जर्मनी आणि एकदाच युरो कप जिंकलेल्या इटलीमध्ये  आतापर्यंत स्पर्धेत अपराजित राहिलेल्या जर्मनीचा धडाका पाहता इटलीसमोर जर्मनीचे कडवे आव्हान असणार आहे. मात्र इतिहासावर नजर टाकल्यास इटलीने जर्मनीला सर्वाधिक वेळा पराभूत करण्याची किमया केलीय.

 

जर्मनी आणि इटली आतापर्य़ंत ३० वेळा आमने-सामने आले आहेत. यामध्ये सर्वाधिक १४ वेळा इटलीने विजय मिळवलाय. तर जर्मनीला केवळ ७ वेळाच विजय मिळवता आलाय. तर ९ वेळा मॅच ड्रॉ झाली आहे.

 

जर्मनीची टीम विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानली जात आहे. मात्र युवा प्लेअर्सच्या भरणा असलेल्या जर्मनी टीमला दोन वर्षांपूर्वी वर्ल्ड कपमध्ये स्पेनकडून पराभूत व्हाव लागल होत. मात्र या पराभवानंतर जर्मनी टीममधील युवा प्लेअर्सने चांगलाच धडा घेतलाय. जर्मनीकडून सर्वाधिक ३ वेळा गोल करणारा मॅरिओ गोम्स, लुकास पोडोलोस्की आणि मिरोस्लॉव हे जर्मनीचे आधारस्तंभ आहेत. तर इटलीची सारी मदार ही मिडफिल्डर एँड्रे पिर्लोवर असले. पिर्लो आणि गोलकिपर बफॉन ही इटलीची ताकद आहे.

 

आघाडीचा मारिओ बालोटेल्ली मिडफिल्डर मोंटोलिव्हो, मॅर्शिसिओ दियामंती हे समीकरण जुळून आल्यास ते जर्मनीलादेखील पराभवाचा धक्का देऊ शकतात. आता जर्मनी आपल्या विजयाची मालिका कायम राखते का इटली जर्मनीला पराभवाचा धक्का देते फायनल गाठते हे पाहाणं रंगतदार ठरणार आहे.

 

व्हिडिओ पाहा..

[jwplayer mediaid="128973"]