पी. कश्यपची आगेकूच!

पी कश्यप बॅडमिंटन ऑलिम्पिकच्या क्वार्टर फायनलमध्ये धडक मारलीय. अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय ठरलाय. त्यानं श्रीलंकेच्या करुणारत्नेला अटतटीच्या लढतीत पराभूत केलंय. कश्यपमनं पहिला गेम 21-14 नं जिंकला.

Updated: Aug 1, 2012, 06:13 PM IST

www.24taas.com, लंडन

 

पी कश्यप बॅडमिंटन ऑलिम्पिकच्या क्वार्टर फायनलमध्ये धडक मारलीय. अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय ठरलाय. त्यानं श्रीलंकेच्या करुणारत्नेला  अटतटीच्या लढतीत पराभूत केलंय. कश्यपमनं पहिला गेम 21-14 नं जिंकला.

 

मात्र त्यानंतर करुणारत्नेनं 21-15नं जिंकत मॅचमध्ये कमबॅक केला. मात्र तिसरा गेममध्ये कश्यप लंकनं प्लेअरला कोणतीचं संधी दिली नाही. ही मॅच जिंकत क्वार्टर फायनलमध्ये धडक मारलीय..

 

राहीचा अंतीम फेरीत प्रवेश

 

भारतीय नेमबाजी प्रशंसकांना एक चांगली बातमी आहे. राही सरनोबत हिने २५ मीटर एयर रायफल स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

 

बॉक्सिंगमध्ये मनोज कुमार प्री-क्वार्टरमध्ये

भारताच्या मनोज कुमारनं प्री-क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश निश्चित केला आहे. त्यानं 64 किलो वजनीगटात तुर्केमेनिस्तानच्या सरदार सरदार हुदायबद्रियेव्हचा 13-7 नं पराभव केला. या मॅचमध्ये मनोज कुमारनं सुरुवातीपासून आक्रमक खेळ केला. आणि यामुळे त्याला हुदायबद्रियेव्हवर मात करण्यात यश आलं. त्याचा प्री-क्वार्टर फायनलचा मुकाबला ग्रेट ब्रिटनच्या थ़ॉमस स्टालकरशी होणार आहे.

 

ऑलिम्पिकमध्ये मॅच फिक्सिंग

ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटनवर फिक्सिंगचे आरोप केले जातायत. चीन, दक्षिण कोरिया आणि इंडोनेशियाच्या आठ बॅडमिंटनपटूंवर हे आरोप करण्यात येतायत. चीनच्या यु वँग आणि वँग झियोली तर दक्षिण कोरियाच्या ज्युंग क्युंग यून आणि किम हाना यांच्यावर फिक्सिंगचे आरोप लावण्यात आलेत. चीन आणि दक्षिण कोरियन टीम मॅच जाणून-बुजून मॅच गमावण्याचा प्रयत्न करत होते. चीनची टीम आपल्या नंबर दोन टीमला फायनलपर्यंत सामना होऊ नये यासाठी प्रयत्न करत होत्या. अखेर ही मॅच दक्षिण कोरियानं जिंकली. चीन आणि दक्षिण कोरियाच्या बॅडमिंटनपटूंबरोबरच इंडोनेशियन प्लेअर्सही यामध्ये सहभागी असल्याची चर्चा आहे. आणि याप्रकरणी चौकशीही सुरु करण्यात आली.