www.24taas.com, लंडन
सुपर मॉम म्हणून प्रसिद्ध असलेल्या भारतीय बॉक्सर मेरी कोमला लंडन ऑलिम्पिकच्या ५१ वजनी किलो गटाच्या बॉक्सिंगमध्ये ब्रिटनच्या निकोला अॅडम्स या बॉक्सरकडून पराभव पत्करावा लागला आहे. नकोला अॅडम्स हिने मेरीला ११-६ अशा फरकाने पराभूत केले.
मेरी कोम पराभूत झाली असली तरी तिच्या पदरात ब्राँझ पदक पडले आहे. त्यामुळे आता भारताने १ सिल्वर आणि तीन ब्राँझ पदक असे एकूण ४ पदकं मिळविले आहेत. या पदकानंतर भारत अजूनही ४५ व्या क्रमांकावर आहे.
पहिला राऊंड
पहिल्या राऊंडमध्ये मेरी कोम २-१ ने पिछाडीवर होती. क्वार्टर फायनलमध्ये आणि त्यापूर्वीच्या सामन्यात जशी धडाकेबाज कामगिरी केली होती. तशी करता आली नाही.
दुसरा राऊंड
दुसऱ्या राऊंडमध्ये मेरी कोम ५-२ ने आणखी मागे पडली. त्यामुळे तिच्यावर दबाव वाढला. नकोलाने तिच्यावर जोरदार प्रहार केले आणि गुण आपल्या पदरात पाडून घेतले.
तिसरा राऊंड
तिसऱ्या राऊंडमध्ये मेरीला केवळ २ गुण घेतला आले. मात्र नकोलाने पुन्हा ३ गुण प्राप्त केले. नकोलाने या राऊंडनंतर ४-८ अशी आघाडी घेतली होती. मेरी टार्गेट सोडून इतत्र प्रहार करीत होती.
चौथा आणि अंतीम राऊंड
चौथ्या आणि अंतीम राऊंडमध्ये मेरीला पुन्हा केवळ दोनच गुण मिळाले. आणि नकोलाने पुन्हा ३ प्रहार मेरीवर केले. त्यामुळे अखेरी मेरी ११-६ अशा फरकाने पराभूत झाली.