झी २४ तास वेब टीम, नवी दिल्ली
कसोटी पदार्पण करतानाच पाच विकेट मिळवणं ही निश्चितच अभिमानाची बाब आहे. अशीच काहीशी सुरवात भारताचा स्पिनर आर. अश्विन केली आहे. त्यामुळे पुढील त्यांच्या खेळाकडे साऱ्यांचे नक्कीच लक्ष लागून राहीलेले असेल. टीम इंडियाचा युवा स्पिनर आर. अश्विनचं टेस्टमधील पदार्पण स्वप्नवत झालं. पदार्पणाच्या मॅचमध्ये अश्विननं 5 विकेट्स घेण्याची किमया केली. भारताकडून पदार्पणातच पाच विकेट्स घेणारा तो पाचवा बॉलर ठरला आहे. अश्विनच्या जबरदस्त कामगिरीमुळे आता टीम इंडियाचा अनुभवी बॉलर हरभजन सिंगच टीममधील स्थानच धोक्यात आलं आहे.
दिल्ली टेस्टमध्ये टीम इंडियाच्या स्पिनर्सचा बोलबाला दिसून आला. टेस्टच्या पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी प्रग्यान ओझानं आपल्या स्पिनची जादू दाखवली. आणि टेस्टच्या तिसऱ्या दिवशी आर. अश्विननं आपल्या स्पिन बॉलिंगनं विंडीजला दणका दिला.अश्विननं स्पिन बॉलिंगनं विंडीज बॅट्समनना सळो की पळो करुन सोडलं. त्याच्य़ा वळणाऱ्या बॉल्सच कोड विंडीज बॅट्समनना अजिबात उलगडता आलं नाही. पदार्पणच्या मॅचमध्येच त्यानं आपली एक वेगळी छाप सोडली. हरभजन सिंगच्या अनुपस्थितीत त्यानं केलेली कामगिरी निश्चितच कौतुकास्पद ठरली.
आर. अश्विननं वेस्ट इंडिजच्या दुस-य़ा इनिंगमध्ये प्रभावी बॉलिंग केली. त्यानं 21.3 ओव्हर्समध्ये 47 रन्स देत विंडिजच्या 6 बॅट्समनला आऊट केलं. वन-डेमध्ये अश्विननं आपल्या स्पिनची जादू याआधीच दाखवली आहे. टीम इंडियाच्या विजयातही त्यानं महत्त्वाची भूमिका बजानली आहे. आणि किरअरीमधील पहिल्याच टेस्टमध्येही अश्विनं आपली निवड सार्थ करुन दाखविली आहे.