इंडिया विजयी घोडदौड कायम ठेवणार का?

सीबी सीरिजमध्ये टीम इंडिया विजय़ी ट्रॅकवर परतली आहे. ऑस्ट्रेलियाला पराभूत केल्यानंतर आता श्रीलंकेला रोखण्याच टीम इंडियाला आव्हान असणार आहे. कांगारूंना पराभवाचा धक्का दिल्यानंतर धोनी अँड कंपनीचा आत्मविश्वास वाढला आहे.

Updated: Feb 13, 2012, 07:00 PM IST

www.24taas.com

 

सीबी सीरिजमध्ये टीम इंडिया विजय़ी ट्रॅकवर परतली आहे. ऑस्ट्रेलियाला पराभूत केल्यानंतर आता श्रीलंकेला रोखण्याच टीम इंडियाला आव्हान असणार आहे. कांगारूंना पराभवाचा धक्का दिल्यानंतर धोनी अँड कंपनीचा आत्मविश्वास वाढला आहे. त्यामुळे लंकेला पराभूत करून टेबल टॉपर बनण्याची टीम इंडियासमोर नामी संधी असणार आहे. रोमहर्षक लढतीमध्ये टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाला पराभवाचा धक्का दिला. या मॅचमध्ये भारतीय बॅट्समनची बॅट चांगलीच तळपली.

 

गौतम गंभीर आणि महेंद्रसिंग धोनीनं शानदार बॅटिंगने भारताला विजयश्री मिळवून दिली. आता, श्रीलंकेविरुद्धच्या मॅचमध्येही भारताकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे. बॉलर्सना म्हणावं तस यश मिळालेलं नाही. त्यामुळे या मॅचमध्ये बॉलर्स मागील मॅचमधील कसर भरून काढण्यास आतूर असतील. लंकेविरुद्ध ऑलराऊंड कामगिरी करणाऱ्या आर. अश्विनला कांगारूंविरुद्ध फारशी कमाल करता आली नव्हती. रवींद्र जाडेजाची स्पिन ब़ॉलिंगही यशस्वी ठरली नाही. तर बॅट्समनमध्ये वीरेंद्र सहेवाग आणि रोहित शर्मा पुन्हा एकदा अपयशी ठरले.

 

रोहित शर्माला वांरवार संधी मिळवूनही त्याला मिळालेल्या संधीच फायदा उचलता आला नाही. चांगली सुरुवात केल्यानंतरही त्याला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. रोटोशन पॉलिसीनुसार वीरेंद्र सेहवागला विश्रांती देऊन सचिन तेंडुलकरचा टीम इंडियात सामवेश करण्यात येण्याची शक्यता आहे. सचिनकडून महासेंच्युरीची अपेक्षा या मॅचमध्ये करता येऊ शकते. गौतम गंभीरला सूर गवसाल्यानं ही बाब भारताच्या पथ्यावरच पडणार आहे. धोनीनही कॅप्टन्स इनिंग खेळल्यानं लंकेसाठी तो धोकादायक ठरणार आहे.

 

श्रीलंकेला या सीरिजमध्ये आत्तापर्यंत एकही विजय मिळवता आलेला नाही त्यामुळे पहिल्या विजायाची नोंद करण्यासाठी जयवर्धनेची टीम प्रयत्नशील असेल. लसिथ मलिंगावर त्यांची बॉलिंगची भिस्त असेल. तर बॅटिंगमध्ये तिलकरत्ने दिलशान आणि कुमार संगकाराला स्फोटक बॅटिंग करावीच लागणार आहे. मिडल ऑर्डरची जबाबदारी कॅप्टन महेला जयवर्धने आणि ऍन्जेलो मॅथ्यूजवर असेल.  आता, भारतीय टीम आपली विजयी मालिका कायम राखते की, लंका आपला पहिला विजय मिळविण्यात यशस्वी ठरते याकडेच क्रिकेटप्रेमींच लक्ष असणार आहे.