टीम इंडिया 'इन फॉर्म'

विनिंग ट्रॅकवर परतलेल्या टीम इंडियाचा मुकाबला ब्रिस्बेनवर ऑस्ट्रेलियाशी होणार आहे.कांगारूंना सलग दोन पराभव पत्करावे लागल्यानं त्यांची टीम विजयासाठी प्रयत्न करेल. तर धोनी ब्रिगेड आपली विजयी मालिका कायम राखण्यास आतूर असणार आहे.

Updated: Feb 19, 2012, 05:09 PM IST

www.24taas.com, ब्रिस्बेन

 

विनिंग ट्रॅकवर परतलेल्या टीम इंडियाचा मुकाबला ब्रिस्बेनवर ऑस्ट्रेलियाशी होणार आहे.कांगारूंना सलग दोन पराभव पत्करावे लागल्यानं त्यांची टीम विजयासाठी प्रयत्न करेल. तर धोनी ब्रिगेड आपली विजयी मालिका कायम राखण्यास आतूर असणार आहे. दरम्यान, दुखापतीमुळे मायकल क्लार्कला याही मॅचला मुकणार आहे. सलामीच्या मॅचमध्ये पराभव सहन केल्यानंतर भारतीय टीमला सुर गवसला आहे.

 

त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मॅचमध्ये आणखी एक विजय मिळवण्याच्या उद्देशानचं टीम इंडिया मैदानात उतरणार आहे. लंकेविरुद्धच्या टाय मॅचमध्ये धोनी अँड कंपनीनं समाधानकारक कामगिरी केली होती. त्यामुळे कांगारुंना आणखी एक पराभवाचा धक्का देण्यावर भारतीय टीम भर देईल. दरम्यान, सचिन तेंडुलकरला म्हणाव तस यश अजूनही मिळालेलं नाही. त्याच्या महासेंच्युरीची प्रतीक्षा अवघ्या क्रिकेटविश्वाला लागली राहीली आहे. त्यामुळे या मॅचमध्ये त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा असणार आहेत.

 

मुंबईकर रोहित शर्माची बॅटिंगही अजून क्लिक झालेली नाही. तर सुरेश रैनालाही फारशी कमाल करता आलेली नाही. त्यामुळे रैना-रोहितची बॅट तळपेल अशी अपेक्षा टीमला असणार आहे. कॅप्टन महेंद्रसिंग धोनीचा फॉर्म या मॅचमध्येही निर्णायक ठरणार आहे. बॉलर्समध्ये विनय कुमार विकेट्स मिळविण्यात यशस्वी ठरतो आहे. आघाडीच्या बॅट्समनना पॅव्हेलियनमध्ये पाठवण्यात त्याला आत्तापर्यंत यश मिळालं आहे. गेल्या मॅचमध्ये विश्रांती मिळालेल्या झहीर खानचा कमबॅक होण्याची शक्यता आहे.

 

उमेश यादवची बॉलिंग अपयशी ठरली आहे. स्पिनर्समध्ये आर अश्विन आणि रवींद्र जाडेजा प्रतिस्पर्ध्यांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. तर दुसरीकडे कांगारूंच्या टीमला सलग दोन पराभव सहन करावे लागले आहेत. त्यामुळे पराभवाची मालिका खंडित करण्याच आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे. कांगारूंचे बॉलर्स चांगली कामगिरी करत आहेत. मात्र, बॅट्समनना अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही. आता टीम इंडिया आपली विजयी मालिका कायम राखते की, ऑस्ट्रेलिया पराभवाची मालिका खंडित करते ते पाहण महत्त्वाचं ठरणार आहे.