'दोन पराभवांमुळे धोनीला मोडीत काढू नये'

इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये भारतीय संघाला हार पत्करावी लागल्यामुळे संघ कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका होत आहे.

Updated: Aug 4, 2011, 07:47 AM IST

झी 24 तास वेब टीम,  लंडन

 

इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये भारतीय संघाला हार पत्करावी लागल्यामुळे संघ कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका होत आहे. अशा वेळी त्याला आवश्यक असलेला पाठिंबा देण्यासाठी पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज वसिम अक्रम पुढे आला आहे. केवळ दोन सामन्यांमधील पराभवामुळे धोनीला मोडीत काढून टाकता येणार नाही, असे अक्रमने म्हटले आहे.

 

'दोन पराभवांमुळे तुम्ही त्याला मोडीत काढू शकत नाही. त्याने भारताला विश्वकरंडक जिंकवून दिला आहे आणि जगातल्या वेगवेगळ्या ठिकाणी त्याने चांगली कामगिरी करून दाखवली आहे. हां एक आहे की, धोनीने त्याच्या यष्टिरक्षणाच्या कौशल्यालाही जपले पाहिजे. तो पराभूत झालाय असं आपण म्हणू शकत नाही, त्यापेक्षा ही त्याच्यासाठी धोक्याची घंटा आहे असे आपण म्हणू', असे म्हणून अक्रमने धोनीबद्दल सहानुभूती व्यक्त केली आहे.

Tags: