www.24taas.com, चेन्नई
पंजाब किंग्ज इलेव्हनने चेन्नई सुपरकिंग्सवर ७ रन्सने विजय मिळविला आहे. १५७ रनचं आव्हान दिल्यानंतर चेन्नईनेही चांगली सुरुवात केली. मात्र त्यानंतर चेन्नईची पूर्ण टीम ही गडगडली. चेन्नईने २० ओव्हरमध्ये ८ विकेट गमावून १४९ रनच करू शकले. चेन्नई कडून डेव्हन ब्राव्हो हा सर्वाधिक ३० रन करू शकला.
चांगल्या सुरुवातीनंतर महेंद्रसिंग धोनी, एस. ब्रदीनाथ, सुरेश रैना, वुद्धीवान साहा हे झटपट बाद झाल्याने चेन्नईची टीम अडचणीत सापडली. ब्रदीनाथला अझर मेहमूदने आऊट केले. डेविड हसीने साहाला आऊट केले. महेंद्रसिंग धोनी २ रनवर रनआऊट झाला. त्याआधी ड्यूप्लेसिस २९ रनवर आऊट झाला. त्याला अझर मेहमूदने कॅचआऊट केले.
पंजाबला चांगली सुरवात करूनही मोठी धावसंख्या उभारता आली नाही. १२.३ ओव्हरमध्य १०० केल्यानंतरही पंजाबला नंतरच्या ७ ओव्हरमध्ये फक्त ५६ रनच करता आल्या. त्यासाठी त्यांनी त्याचें ८ गडी गमावले. धावा काढण्याच्या प्रयत्नात पंजाबचे फलंदाज एका पाठोपाठ बाद होत गेले. त्यामुळे पंजाबला चेन्नईसमोर केवळ १५७ रनचं माफक आव्हान ठेवता आलं. चेन्नईच्या बॉलरनी अखेरच्या ओव्हरमध्ये चांगली बॉलिंग केली. अल्बी मार्केलने २९ रन देऊन ३ विकेट घेतल्या. तर ब्रॉव्होनेही २ विकेट घेतल्या.