मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर भारत विरुध्द वेस्ट इंडिज तिसरी टेस्ट अखेरच्या चेंडूपर्यंत रंगतदार ठरली. भारताला शेवटच्या चेंडूवर दोन धावा काढण्यात अपयश आल्याने सामना अनिर्णित राहिला. भारताने तीन टेस्टची सिरीज 2-0 अशी जिंकली. भारताने पहिल्या डावात 482 आणि दुसऱ्या डावात नऊ बाद 242 रन्स काढल्या. वेस्ट इंडिजने पहिल्या डावात 590 रन्स आणि 134 रन्स काढल्या. वेस्ट इंडिजच्या ब्रावोने पहिल्या डावात 166 रन्स फटकावल्या. पहिल्या डावात शतक ठोकणारा आर. आश्विन मॅन ऑफ मॅच तसंच मॅन ऑफ द सिरीजचाही मानकरी ठरला. भारताकडून दुसऱ्या डावात सेहावागने 60, कोहलीने 63 आणि द्रविडने 33 रन्स फटकावल्या. ओझाने 6 तर आश्विने 4
विकेटस घेतल्या.