'रोहित' ठरणार का 'हिट'?

टीम इंडियाच्या यंगिस्तानमध्ये सध्या 'रेस फॉर मिडल ऑर्डर' सुरु आहे. यामध्ये विराट कोहली, रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे सध्या आघाडीवर आहे. टीममध्ये स्थान पक्क करण्यासाठी प्रत्येकजण आपल्याला सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो आहे.

Updated: Dec 4, 2011, 08:26 AM IST

झी २४ तास वेब टीम, विशाखपट्टणम

 

टीम इंडियाच्या यंगिस्तानमध्ये सध्या 'रेस फॉर मिडल ऑर्डर' सुरु आहे. यामध्ये विराट कोहली, रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे सध्या आघाडीवर आहे. टीममध्ये स्थान पक्क करण्यासाठी प्रत्येकजण आपल्याला सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो आहे. दुखापतीमुळे बाहेर रहावं लागलेल्या रोहितनं 'बॅक टू बॅक' हाफ सेंच्युरी ठोकत निवड समितीचा विश्वास सार्थ ठरवला आहे.

 

वेस्ट इंडिजविरुद्धच्या वन-डे सीरिजमध्ये टीम इंडियाची भिस्त आहे ती यंगिस्तानवर. मुंबईकर रोहित शर्मानं तर दोन्ही वन-डेमध्ये सलग हाफ सेंच्युरी झळकवत भारताच्या विजयामध्ये मोलाचा वाटा उचलला. दुखापतीतून सावरत त्यानं ही कामगिरी केली. भारताची यंगब्रिगेड फॉर्ममध्ये आहे. आणि प्रत्येक जण आपल्य़ा कामगिरीनं टीममधील स्थान कायम करण्याच्या प्रयत्नात आहे. रोहितनही आपल्या इनिंगनं साऱ्यांचच लक्ष वेधून घेतलं आहे.

 

रोहित टीम इंडियामध्ये कमबॅक केल्यनंतर तुफान फॉर्ममध्ये आहे. त्याचा फॉर्म भारतासाठी महत्त्वाचा ठरतो आहे. या सीरिजमध्ये तो विंडिज टीममसाठी चांगलाच धोकादायक ठरला. रोहितनं भारताला नेहमीच अविस्मरणीय विजय़ मिळवून दिले आहेत. टीम इंडियाला त्याच्यासारख्या क्रिकेटपटूची आवश्यकता आहे. भारतातील युवा बॅटिंग टॅलेंटपैकी तो एक आहे. मॅचविनर क्रिकेटपटूची गुणवत्ताही त्याच्यामध्ये आहे. त्यामुळे रोहितनं असंच खेळत राहव अशी त्याच्या चाहत्यांची इच्छा असणार आहे.