वीरू ठरला उन्नीस नंबरी!!!!

इंदूरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर वीरेंद्र सेहवाग नावाचं वादळ चांगलच घोंगावलं. वीरुच्या तडाख्यामध्ये विंडिज बॉलर्स चांगलेच सापडले.

Updated: Dec 9, 2011, 02:14 PM IST

झी २४ तास वेब टीम, इंदूर

 

इंदूरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर वीरेंद्र सेहवाग नावाचं वादळ चांगलच घोंगावलं. वीरुच्या तडाख्यामध्ये विंडिज बॉलर्स चांगलेच सापडले. त्याच्या बॅटमधून निघालेला प्रत्येक बॉल हा सीमापार जात होता. त्याच्या धडाक्यापुढे विंडिजची टीम अक्षरक्ष: हतबल झालेली दिसली. त्याच्या झंझावातसमोर विंडिज बॉलर्स अक्षरश: नतमस्तक झाले.

 

याचदरम्यान वीरुच्या नावावर एक अनोखा रेकॉर्डही जमा झाला आहे. त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळल्य़ा गेलेल्या सर्वोत्तम इनिंगमध्ये १९ हा आकडा कॉमन आहे. त्यानं टेस्टमध्ये ३१९ रन्स, वन-डेमध्ये २१९ रन्स आणि टी-20 मध्ये ११९ रन्स ही त्याची सर्वोत्तम इनिंग आहे.

 

आपल्या बॅटिंगनं क्रिकेटमध्ये रेकॉर्डब्रेक कामगिरी करणाऱ्या वीरुच्या नावावर आता आणखी एका रेकॉर्डची नोंद झाली आहे.वीरुच्या नावावर एका आगळ्या-वेगळ्या रेकॉर्डची नोंद झाली आहे. सध्या त्याचा १९ चा फॉर्म्युला चांगलाच हिट ठरत आहे असचं म्हणावं लागणार आहे.