वेस्ट इंडिजला लोळवलं

दुसऱ्या टेस्टमध्ये वेस्ट इंडिजने सुरवातीला केलेल्या चिवट फलंदाजीनंतर मात्र वेस्ट इंडिजचा डाव गडगडला. इंडियन बॉलर्सने पुन्हा एकदा कमाल केली. त्याच्या बॉलिंगपुढे पुन्हा एकदा विंडीज बॅट्समन्सनी नांगी टाकली.

Updated: Nov 17, 2011, 08:18 AM IST

झी २४ तास वेब टीम, कोलकाता

 

इंडियाने ईडन गार्डनवरील दुसऱ्या टेस्टमध्ये वेस्टइंडिजवर दणदणीत विजय मिळवत सामन्यासह २-० ने मालिकाही खिशात टाकली. वेस्ट इंडिजवर  १ डाव आणि १५ रन्सने केली मात, वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या इंनिगमध्ये उमेश यादवने ४ विकेट घेतल्या तर ओझा, इंशात आणि अश्विन यांनी प्रत्येकी २ विकेट घेत टीमच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. वेस्ट इंडिजने काही काळ मात्र इंडियाला विजयासाठी चांगलेच झुंजवले

 

दुसऱ्या टेस्टमध्ये वेस्ट इंडिजने सुरवातीला केलेल्या चिवट फलंदाजीनंतर मात्र वेस्ट इंडिजचा डाव गडगडला. इंडियन बॉलर्सने पुन्हा एकदा कमाल केली. त्याच्या बॉलिंगपुढे पुन्हा एकदा विंडीज बॅट्समन्सनी नांगी टाकली.  इंडिया आता विजयाचा जवळच आहे. ३ विकेट फक्त विजयासाठी आवश्यक आहे. यामुळे टीम इंडिया मॅचसोबतच  ३ टेस्ट मॅचची सिरीज खिशात घालणार.

 

ईडन गार्डन्सवर सुरू असलेल्या दुसऱ्या टेस्टच्या चौथ्या दिवशी विजयासाठी भारताला जरा जास्तच वाट पहावी लागणार आहे. पहिल्या इनिंगमध्ये भारतीय बॉलर्सपुढे लोटांगण घेणाऱ्या विंडिज बॅट्समन्सनी सेकंड इनिंगमध्ये मात्र भारताच्या बॉलिंगचा समर्थपणे सामना केला. डॅरेन ब्राव्होने चंद्रपॉल आणि सॅम्युलस् यांच्यासह मोलाच्या पार्टनरशिप करत विंडिजची इनिंग सांभाळली. दरम्यान डॅरेन ब्राव्होने आपल्या टेस्ट करियरमधील दुसरी शानदार सेंच्युरी झळकावली. तर सॅम्युलस्ने ही हाफ सेंच्युरी झळकावली. आता टीम इंडियाच्या बॉलर्ससमोर ब्राव्होला लवकरात लवकर आऊट करून टेस्टसह सीरिज जिंकण्याचं आव्हान असणार आहे.

 

कोलकाता टेस्टमध्ये तिसऱ्या दिवसअखेर भारतानं विजयाच्या दिशेने आगेकूच केली. दिवसअखेर विंडिजनं फॉलऑननंतर दुसऱ्या इनिंगमध्ये ३ विकेट् गमावून १९५ रन्स केले. तत्पूर्वी पहिल्या इनिंगमध्ये कॅरेबियन टीम केवळ १५३ रन्सवर गारद झाली. पहिल्या इनिंगमध्ये भारताकडून प्रग्यान ओझानं ४ तर उमेश यादवनं ३ विकेट्स घेतल्या. ४७८ रन्सनी पिछाडीवर असणाऱ्या विंडिजची दुसऱ्या इनिंगमध्येही खराब सुरुवात झाली.दुसऱ्या इनिंगमध्ये वेस्ट इंडिजनं दिवसाअखेर ३ विकेट गमावून १९५ रन्स केले. ब्राव्हो ३८ रन्सवर तर चंद्रपॉल २१ रन्सवर खेळत आहे. वेस्ट इंडिजला इनिंग पराभव टाळण्यासाठी २८३ रन्सची गरज आहे. तर भारताला सीरिज विजयासाठी ७ विकेट्ची आवश्यक्ता आहे.

 
फॉलोऑनची नामुष्की घेऊन मैदानात आलेल्या विंडिजच्या सेकंड इनिंगचीही अडखळती सुरूवात झाली. पहिल्या इनिंगमध्ये तीन विकेट्स घेणाऱ्या उमेश यादवने ब्रेथवेटला केवळ ९ रन्सवर आऊट केलं. पण त्यानंतर किर्क एडवर्डस आणि आंद्रे बराथ जोडीने भारतीय बॉलर्सना अधिक यश मिळू दिलं नाही दरम्यान विंडिजच्या बराथने हाफ सेंच्युरीही पुर्ण केली तर टीम इंडिया कोलकाता टेस्टमध्ये विंडीजची सेकंड इनिंग झटपट गुंडाळून मोठ्या विजयाची नोंद करून, सीरिज विजयासाठी आतूर असणार.