सचिनने केला राम राम.... कर्णधारपदाला

सचिन तेंडुलकरने आयपीएल-५ साठी मुंबई इंडियन्सचं कर्णधारपद सोडलं आहे, आणि त्याचं कर्णधारपद हरभजन सिंहकडे सोपावलं आहे. सचिन तेंडुलकरने मुंबई इंडियन्सच्या व्यवस्थापनाशी बोलून हा निर्णय घेतला.

Updated: Apr 2, 2012, 09:53 PM IST

www.24taas.com, मुंबई

सचिन तेंडुलकरने आयपीएल-५ साठी मुंबई इंडियन्सचं कर्णधारपद सोडलं आहे, आणि त्याचं कर्णधारपद हरभजन सिंहकडे सोपावलं आहे. सचिन तेंडुलकरने मुंबई इंडियन्सच्या व्यवस्थापनाशी बोलून हा निर्णय घेतला.

मुंबई इंडियन्सचा पहिल्या सत्रापासून ते चौथ्या सत्रापर्यंत सचिन हाच कॅप्टन होता. पण आता आयपीएलच्या पाचव्या सत्रात त्यांने आपलं कर्णधार पद सोडलं आहे, त्याला झालेली दुखापत हे त्यासाठी कारण सांगण्यात येत आहे.

सचिन या विषयावर खुद्द हरभजनशी बोलला असल्याचे समजते. त्यानंतर हरभजनने या बदलाची माहिती  दिली. कर्णधारपद सांभाळणे माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट असेल. माझ्या क्षमतेनुसार मी ही जबाबदारी पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. ’ असं हरभजने स्पष्ट केले.

सचिन म्हणाला की, मुंबई इंडियन्स संघ माझ्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. हा संघ माझ्यासाठी कुटुंबासारखा आहे. मात्र संघाच्या कर्णधारपदाच्या जबाबदारीतून विश्रांती घेण्याची वेळ आली असल्याचं मला वाटलं. हरभजनसिंगकडे जबाबदारी सोपविण्याच्या माझ्या निर्णयाबद्दल मी मुकेश भाई आणि नीता भाभी यांच्याशी चर्चा केली आहे.