हैदराबादात आतापर्यंत झालेले दहशतवादी हल्ले

हैदराबाद शहर नेहमी दहशतवाद्यांच्या निशाण्यावर राहिलेले आहे. यातील काही प्रमुख घटना पुढील प्रमाणे

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Feb 21, 2013, 09:59 PM IST

www.24taas.com, हैदराबाद
हैदराबाद स्फोटासंबंधी काही विशेष बाबी
* सायकल, टिफिन बॉक्स मध्ये बॉम्ब ठेवल्याची शक्यता
* संध्याकाळी ७ वाजून १ मिनिटांनी झाला पहिला स्फोट: सूत्र
* दहशतवादी हल्ल्याच्या शक्यतेचा इन्कार नाही: पोलिस कमिशनर
* स्फोटांची तीव्रता जास्त: गृह सचिव
* यापूर्वी मे आणि ऑगस्ट २००७ मध्ये दोन स्फोट झाले होते.
* आंध्र प्रदेश, दिल्ली आणि मुंबईत हायअलर्ट
* स्फोटातील जखमींची संख्या ५०
* बॉम्ब निकामी पथक आणि फोरेंसिक टीम घटनास्थळी पोहचली
यापूर्वी हैदराबादमध्य झालेले दहशतवादी हल्ले

हैदराबाद शहर नेहमी दहशतवाद्यांच्या निशाण्यावर राहिलेले आहे. यातील काही प्रमुख घटना पुढील प्रमाणे
- 26 फेब्रु 2001-राज्य सचिवालया बाहेर स्फोट जीवितहानी नाही.
- 21 नोव्हेंबर 2002- दिलसुखनगरमध्ये स्कूटर बॉम्बस्फोट। एक ठार
- 28 ऑक्टोबर 2004 – पाटनचेरूमध्ये पाण्याच्या मेन पाइप लाइनमध्ये स्फोट
- 4 नोव्हेंबर 2004 - पोलिस कंट्रोल रूममध्ये बाहेर स्फोट । जीवितहानी नाही.
- 12 ऑक्टोबर 2005 - स्पेशल टास्क फोर्सच्या ऑफिसवर हल्ला । दोन ठार।
- 7 मे 2006- थिएटरमध्ये स्फोट । तीन जखमी।
- 18 मे 2007- मक्का मस्जिदमध्ये स्फोट । 14 ठार।
- 25 ऑगस्ट 2007 – शहरात दोन स्फोट । 41 ठार