...अन् भर विधानसभेत मुख्यमंत्र्यांना रडू कोसळंल!

आज जम्मू-काश्मीर विधानसभेत मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरले. भर सभेत जवळजवळ एका मिनिटापर्यंत आपला चेहरा आपल्या दोन्ही हातांत घेऊन ते हुंदके देत राहिले.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Mar 6, 2013, 03:54 PM IST

www.24taas.com, जम्मू
आज जम्मू-काश्मीर विधानसभेत मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरले. भर सभेत जवळजवळ एका मिनिटापर्यंत आपला चेहरा आपल्या दोन्ही हातांत घेऊन ते हुंदके देत राहिले.
ओमर अब्दुल्ला हे विधानसभेत काही दिवसांपूर्वी अफजल गुरुच्या फाशीनंतर काश्मीरमध्ये उसळलेल्या दंग्याबद्दल बोलत होते. यावेळी पोलीस फायरिंगला बळी पडलेल्या २४ वर्षीय ताहिर लतिफ सोफी या युवकाच्या मृत्यूची माहिती ते विधानसभेत देत होते. सुरक्षा दलाच्या जवानांनी काश्मीरमध्ये सुरु असलेल्या प्रदर्शनांच्य दरम्यान गोळी चालविली होती. त्यात या तरुणाचा मृत्यू झाला होता.
‘त्यानं दगड मारला असेल पण दगड फेकणाऱ्यांना काय गोळीनं उडवणार का? ही पहिलीच वेळ होती जेव्हा संतप्त लोकांनी सुरक्षा दलाच्या जवानांवर दगडफेक केली होती? मग गोळी का चालवण्यात आली? विरोधकांना वाटतं की सरकारला याबद्दल काहीच भावना नाहीत. खरं म्हणजे विरोधकांपेक्षा या युवकांसाठी आम्ही तडफडतो’ असं म्हणत असताना ओमर अब्दुल्ला यांना रडणं आवरलं नाही.

‘सभा सोडून विरोधीपक्ष बाहेर निघून गेले. पण मी... मला असं करता येणार नाही कारण मी मुख्यमंत्री आहे. पण, मलाही उत्तर हवंय की किती वेळा अशा हत्यांसाठी मला लोकांना सामोरं जाऊन त्यांची माफी मागायला लागणार आहे? या आंदोलकांवर गोळी चालवायची काय गरज होती? सशस्त्र बल विशेष अधिनियम लवकरात लवकर संपुष्टात यावा असं म्हणणारा, मी काही वेडा नाह’ असं म्हणताना ते भावनाविवश झाले होते.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x