अजित पवारांची `कालवा` कालव!

उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर अजित पवारांचा नगर जिल्ह्यातल्या अकोले या ठिकाणी पहिला जाहीर कार्यक्रम होतोय. मागील चाळीस वर्षांपासून काम सुरू असलेल्या निळवंडे धरणाच्या उच्चस्तरीय कालव्याचं भूमिपूजन आणि पाणीपुरवठा योजनेच्या शुभारंभ यावेळी करण्यात येणार आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Sep 30, 2012, 07:24 AM IST

www.24taas.com, अहमदनगर
उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर अजित पवारांचा नगर जिल्ह्यातल्या अकोले या ठिकाणी पहिला जाहीर कार्यक्रम होतोय. मागील चाळीस वर्षांपासून काम सुरू असलेल्या निळवंडे धरणाच्या उच्चस्तरीय कालव्याचं भूमिपूजन आणि पाणीपुरवठा योजनेच्या शुभारंभ यावेळी करण्यात येणार आहे.
कालच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अजित पवार यांचा राजीनामा स्वीकारला. त्यानंतर त्यांनी राज्यपालांना राजीनामा मंजूर करण्याची शिफारस केली होती. त्यामुळे राज्यपालांनी अजित पवारांचा राजीनामा मंजूर केला. त्यामुळे राजीनामा नाट्यावर आता पडदा पडला. त्यामुळे भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी अजित पवार .णार का असा प्रश्न होता.
मात्र 15 दिवसांपूर्वीच हा कार्यक्रम निश्चित करण्यात आला होता. त्यामुळे राजीनामा दिल्यावरही अजित पवार आले. यात योगायोग म्हणजे सिंचन घोटाळ्याच्या आरोपामुळे अजित पवारांनी राजीनामा दिलाय आणि राजीनाम्यानंतर पहिला जाहीर कार्यक्रम होतोय तोही सिंचनाशी निगडीत असलेलाच.