www.24taas.com, चिपळूण
८६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २०१३ मध्ये चिपळूणला होणार आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुण्यात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ८६ व्या अ भा. मराठी साहित्य संमेलनासाठी कराड, यवतमाळ आणि चिपळूण या तीन ठिकणाहून निमंत्रण आली होती.
त्यातून चिपळूणची निवड करण्यात आली आहे. गेल्या २२ वर्षात कोकणात साहित्य संमेलन झालेलं नाही. तसंच निमंत्रक संस्था असलेल्या लोकमान्य टिळक स्मारक ग्रंथालयाला २०१३ मध्ये १५० वर्ष पूर्ण होत आहेत.
त्यामुळे चिपळूण येथे साहित्य सम्मेलन घेण्याची शिफारस स्थळ निवड समितीने केली होती. त्यावर महामंडळाच्या पुण्यातील बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. पण त्यानिमित्ताने तब्बल २२ वर्षानी कोकणात साहित्य संमेलनाची मजा कोकणवासीयांना अनुभवता येणार आहे.