काँग्रेस आणि शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्यांमध्ये हाणामारी

नांदेड जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत अभूतपूर्व गोंधळ झाला. काँग्रेस आणि शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. सदस्यांनी चक्क एकमेकांवर खुर्च्या भिरकावल्या. शिवसेनेच्या महिला सदस्याचे निलंबन केल्यामुळं हा गोंधळ घालण्यात आला.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jan 16, 2013, 09:51 PM IST

www.24taas.com, नांदेड
नांदेड जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत अभूतपूर्व गोंधळ झाला. काँग्रेस आणि शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. सदस्यांनी चक्क एकमेकांवर खुर्च्या भिरकावल्या. शिवसेनेच्या महिला सदस्याचे निलंबन केल्यामुळं हा गोंधळ घालण्यात आला.
गेल्या सर्वसाधारण सभेत शिवसेनेच्या सदस्या सारिका पवार यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर यांच्या अंगावर बांगड्या फेकल्या. त्यामुळं सारिका पवार यांचं सदस्यत्व रद्द करण्याची मागणी सत्ताधारी काँग्रेस सदस्यांनी केली होती. याला शिवसेना सदस्यांनी आक्षेप घेतला आणि गोंधळाला सुरूवात झाली.
दोन्ही पक्षाचे सदस्य एकमेकांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत होते. पोलिसांनी यात हस्तक्षेप केल्यामुळं तुंबळ हाणामारीचा प्रकार टळला. या गोंधळातच सारिका पवार यांच्या निलंबनाचा ठराव मंजूर करण्यात आला.