औरंगाबादमध्ये २३ वर्षीय तरूणीवर गँगरेप

औरंगाबादमध्ये २३ वर्षाच्या तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. औरंगाबादच्या बायजीपुरा भागात ही घटना घडली आहे.

Updated: Jan 25, 2013, 03:02 PM IST

www.24taas.com, औरंगाबाद
औरंगाबादमध्ये २३ वर्षाच्या तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. औरंगाबादच्या बायजीपुरा भागात ही घटना घडली आहे. पीडित तरुणीचे चार जणांनी अपहरण केले. अपहरण करुन तिला एका खोलीत नेऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आले.
या प्रकरणात चार जणांना पोलिसांनी अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे औरंगाबादेतील गाजलेलं मानसी देशपांडे हत्याकांडात निर्दोष ठरलेला राम बोडके या प्रकरणात आरोपी आहे.
मानसी देशपांडेच्या हत्येचा आरोप राम बोडकेवर होता. कोर्टातून तो निर्दोष सुटला होता. सामूहिक बलात्कार करणाऱ्या चारही आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे.