www.24taas.com, मुंबई
गुढी म्हणजे विजयपताकाच, गुढी म्हणजे विजयाचं प्रतिक, हीच गुढी कशी उभारावी याबाबत मात्र काही शास्त्र आहे. त्यामुळे ही गुढी उभारताना विजयाचा थाटातच उभारली जावी.
गुढी ६-१० फूट लांबीच्या लाकडी काठीपासून बनविली जाते. त्यावर रेशमी वस्त्र, त्या वस्त्रावर चांदीचा किवा पितळेचा गडू, या विजयध्वजावर सुगंधी फुलांची माळ यांनी गुढी साकारली जाते. छोटी कडूलिंबाची डहाळी सुद्धा बांधली जाते. गुढी छोट्या लाकडी पाटावर, थोडी तिरकस उभारतात.
हल्ली बाजारात तयार गुढी विकत मिळतात. त्या दिसायलाही छान दिसतातच तसेच त्यांच्या किमतीही माफक असतात. तसेच शोभेच्या गुढीहि बाजारात उपलब्ध आहेत, त्या साधारण १२ इंच लांबीच्या असतात, हल्लीचा युवक वर्गामध्ये त्या प्रसिद्ध आहे. मराठी युवक अशा प्रकारच्या गुढी घेऊन ऑफिसमध्ये स्वतःच्या टेबलवर ठेवतो.
अवघी अर्धा फूट उंचीची, एखाद्या पुरस्काराच्या ट्रॉफी एवढी ही छोटाली गुढी बाजारात सध्या चांगलीच हिट झाली. या गुढींची किंमत ५० ते १०० रुपयांच्या घरात आहे. तसंच, ती टिकाऊ आहे. एकदा घेतलेली गुढी अनेक वर्ष वापरता येत असल्याने नव्या ग्राहकांच्या त्यावर उड्या पडत आहेत.