सर्वांना पडतात ही १४ कॉमन स्वप्न...

 ९० मिनिटे किंवा दोन तास प्रत्येक रात्री पृथ्वीवरील प्रत्येक मनुष्याला स्वप्न पडतात. काही वेळा स्वप्न हे खूप थेट असतात आणि त्यांचे अर्थही स्वप्न पडणाऱ्याला कळतात. जुना मित्र भेटणे, लॉटरी लागणे असे स्वप्न पडतात. 

Updated: Jul 11, 2016, 11:16 PM IST
सर्वांना पडतात ही १४ कॉमन स्वप्न...  title=

मुंबई :  ९० मिनिटे किंवा दोन तास प्रत्येक रात्री पृथ्वीवरील प्रत्येक मनुष्याला स्वप्न पडतात. काही वेळा स्वप्न हे खूप थेट असतात आणि त्यांचे अर्थही स्वप्न पडणाऱ्याला कळतात. जुना मित्र भेटणे, लॉटरी लागणे असे स्वप्न पडतात. 

पण अशी काही १४ स्वप्ने आहेत ती जगातील कोणत्याही व्यक्तीला पडतात आणि ती सोपी आणि थेट असतात, त्यांचे अर्थ प्रत्येक स्वप्न पडणाऱ्याला लागतात. 

१) कोणाचा तरी पाठलाग 

हे सर्वात कॉमन स्वप्न आहे. या स्वप्नात आपण कोणाच तरी पाठलाग करतो. पण आपल्या पळता येत नाही. आपण जागेवरच पळत असतो, पण त्याला पकडता येत नाही. झोपेतून उठल्यावर सहज लक्षात राहणारं स्वप्न आहे. 

२) पाण्याचे स्वप्न 
पाणी हे आपल्या भावनांशी निगडीत असते त्यामुळे पाण्याचे स्वप्न आपल्या नेहमी पडत असतं. 

३) वाहनांचे स्वप्न 
कार, विमान, ट्रेन किंवा जहाज अशा प्रकारचे वाहनं आपल्या स्वप्नात येत असतात. आपण जागे पणी यांची स्वप्ने पाहत असतो. ती स्वप्ने आपण झोपेतही पाहतो. हे वाहन आपल्याकडे असायला हवे असे वाटत असते. वाहनावर आपण आपलं ध्येय ठरवत असतो. ड्रीम बाईक, ड्रीम कार, ड्रीम व्हेइकल असे प्रत्येकाच्या मनात असते. 

४) व्यक्तींचे स्वप्न 
आपण आपल्या स्वप्नांमध्ये इतर व्यक्ती पाहत असतो. आपल्या रोजच्या आयुष्यात येणारे आणि आपल्या आयुष्यात आलेले व्यक्ती कधी तरी एकाच स्वप्नात येत असतात. 

५) शाळा किंवा शाळेचा वर्ग 
सर्वात कॉमन स्वप्नामध्ये या प्रकाराचा समावेश होतो. आपण कधी तरी आपल्याच शाळेत पुन्हा दिसू लागतो. किंवा आपल्या आवडत्या वर्गात दिसतो. एखादा धडा शिकत असतो, किंवा टेस्ट देत असतो. या द्वारे आपण आपल्या भूतकाळाला पुन्हा शिकत असतो. असे स्वप्न ज्यांनी बराच काळ झाला शाळा सोडली आहे, अशांना दिसतात. 

६) पॅरालाइज ( पक्षाघात)
स्वप्नामध्ये शरिराचा एखादा अवयव पॅरालाइज म्हणजे हालचाल करता येत नाही असा होऊ जातो. चालत असताना हा अवयव काहीच काम करत नाही असं स्वप्नात दिसत असतं. आपण आपल्या आयुष्यात कमकुवत झालो आहे, अशी भावना रूढ होते. त्यामुळे हे स्वप्न पडतं. 

७) मरणाचे स्वप्न 
आपण मरण पावलो आहे असं स्वप्न पडतं त्यामुळे मनावर नेगेटीव्ह परिणाम होतो. पण एक गोष्ट संपली आहे आणि आपल्या आयुष्यात दुसरी एखादी नवीन गोष्ट होणार आहे, असेही त्यावेळी वाटते. 

८) उडण्याचे स्वप्न

आपण हवेत मुक्तपणे उडतो आहे असे स्वप्न पडते. त्यामुळे आपल्या जीवनावर आपल्या किती कंट्रोल आहे, हे या स्वप्नातून स्पष्ट होते. आपण किती कॉन्फिडंट आहोत आणि आपले ध्येय प्राप्ती झाली आहे. असा या स्वप्नाचा अर्थ असतो. पण उडत असताना आपण खूप खाली गेलो आहे आणि काही अडचण आली आहे, असे वाटले तर खूप वाईट वाटते. 

९) खाली पडणे 

आपण कुठून तरी उंचावरून पडतो आहे असे स्वप्न पडते, ते खूप भीतीदायक आणि नेगेटीव्ह असते. त्याचा परिणाम आपल्या झोपतानाच्या शारीरिक हालचालींवर होत असतो. या स्वप्नाचा अर्थ असा असतो की आपल्या आयुष्यात कोणी तरी आले आहे, पण आपण आपल्यावरील कंट्रोल गमावून बसलो आहे. 

१०) नग्नता 
आपण सार्वजनिक जीवनात ज्या गोष्टी खूप खासगी ठेवतो, त्या गोष्टी आपण आपल्या स्वप्नात खूप उघडपणे आणतो. त्यामुळे जे शरिराचे अवयव आपण झाकून ठेवतो ते स्वप्नात उघड करतो. त्यामुळे नग्नता हे आपल्या स्वप्नाचा एक भाग होतो. 

११) लहान मुले
स्वप्नात लहान मुले येणे हे काही तर नव निर्मितीचे संकेत असतात. नवीन आय़डीया, नवीन प्रोजेक्ट, नवीन घटना तुमच्या आयुष्यात येत असा या स्वप्नाचा अर्थ आहे. 

१२) अन्न 

अन्न हे उर्जा, ज्ञान, पोषण याच्याशी संबंधी असते. तसेच भावनांशी निगडीत आहे.  तुम्ही भुकेलेले असतात तेव्हा तुम्हांला असे स्वप्न पडतात. 

१३) घराचं स्वप्न 

घराचं स्वप्न हे प्रत्येकाच्या मनात आहे. ते घर कसे असावे, त्याची मनात रंजक स्वप्ने रंगवत असतात. बेडरूम कसे असावे, आयुष्य कसे असावे. 

१४) सेक्स 

सेक्स हा त्यांच्या प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग असतो. तो स्वप्नात न आल्यास कसा चालेल. आपण ज्या व्यक्तीची इच्छा करतो. त्या व्यक्तीशी सेक्स करताना आपण स्वप्नात पाहतो. ज्या व्यक्तीशी आपण रिअल लाइफमध्ये सेक्स करू शकत नाही. त्याचीशी स्वप्नात सेक्स करतो आणि आपली इच्छा पूर्ण करतो. ती व्यक्ती कोणीही असू शकते. एखादी अभिनेत्री, अभिनेता, आवडणारी व्यक्ती, नातेवाईक कोणीही... 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.