मुंबई : भारतात अशी कोणतीही जागा नसेल जेथे हनुमानाची पूजा केली जात नसेल. रामदूत हनुमान हे भक्ती, सेवा, श्रद्धा आणि समर्पण याची मूर्ती आहे. हनुमान हे चरित्र आणि ब्रम्हचर्य व्रत याची प्रेरणा देतात. हनुमान हे संयम, पवित्रता आणि शिस्त याचे उत्कृष्ट उदाहरण आहे.
रोज नवी आशा, उत्साह, ऊर्जा मिळो यासाठी हनुमानाची संपूर्ण समर्पणपणे पूजा केली पाहिजे. हनुमान संकल्प, एकाग्रता, ध्यान आणि साधना हे गुण जीवनात आणण्यासाठी प्रेरणादायी आहेत.
शास्त्रांमध्ये असं सांगितलं आहे की श्री हनुमानचे वेगवेगळे 12 रूप आहेत. या सर्व स्वरुपांची उपासना एका खास मंत्राने केलं गेलं तर संपूर्ण 12 महिने शुभ आणि भाग्यवान ठरू शकतात. मंगळवारी आणि शनिवारी सकाळी आणि रात्री या मंत्राचा उच्चार केला पाहिजे.
हनुमानञ्जनी सूनुर्वायुपुत्रो महाबल:।
रामेष्ट: फाल्गुनसख: पिङ्गाक्षोमितविक्रम:।।
उदधिक्रमणश्चैव सीताशोकविनाशन:।
लक्ष्मणप्राणदाता च दशग्रीवस्य दर्पहा।।
एवं द्वादश नामानि कपीन्द्रस्य महात्मन:।
स्वापकाले प्रबोधे च यात्राकाले च य: पठेत्।।
तस्य सर्वभयं नास्ति रणे च विजयी भवेत्।।
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.