www.24taas.com
लग्न म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचा असा विषय असतो. प्रत्येकाला त्याच्या होणाऱ्या जोडीदाराबद्दल उत्सुकता असते. तो कसा असेल? किंवा ती कशी असेल... माझं लव्ह मॅरेज होईल की अरेंज्ड? एक ना अनेक प्रश्न मनात रुंजी घालत असतात. या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी तुमची जन्मपत्रिका फारच महत्त्वाचे काम करते. सर्वात आधीतर हे बघणे जरूरी आहे की लग्नाचे योग आहे की नाही?
लग्नाचा योग केव्हा येईल या गोष्टींवर लक्ष्य देणे गरजेचे आहे? आधी लग्नाचे सामान्य वय 23-24 वर्ष होते. जे आता वाढून 26-27 वर्ष झाले आहे. जर बाकी सर्व गोष्टी सामान्य असतील तर या वयापर्यंत विवाह निश्चित होतो.
प्रेम विवाह : जर पंचम भावाचा स्वामी सप्तम भावात, लग्न किंवा व्यय भावाशी संबंध बनत असेल तर प्रेम विवाह किंवा परिचय विवाहाचा योग असतो. जर पंचमेश सप्तममध्ये किंवा सप्तमेश पंचममध्ये असेल तरी प्रेम विवाहाचा योग बनतो. जर पंचम किंवा सप्तमचा स्वामी व्यय भावात असेल तर मनाप्रमाणे विवाह होतो पण विवाह सुख मिळत नाही.
जर पंचमेश किंवा सप्तमेश शुभ ग्रह असून राशी परिवर्तन करत असतील तर विवाह सुखमय आणि भाग्य वाढवणारा असतो. जर हे अशुभ ग्रह असतील तर वादविवाद कायम बनलेला असतो. सप्तमेशचे लग्नात असणेसुद्धा परिचय विवाहाचे संकेत आहे.