माघी गणेशोत्सव : पुजेची वेळ आणि तिथी

कोणत्याही चांगल्या कार्याची सुरुवात आपल्याकडे गणेशपूजनाने होते. आज माघी गणेशोत्सवाला सुरुवात झालीये.

Updated: Jan 31, 2017, 11:05 AM IST
माघी गणेशोत्सव : पुजेची वेळ आणि तिथी title=

मुंबई : कोणत्याही चांगल्या कार्याची सुरुवात आपल्याकडे गणेशपूजनाने होते. आज माघी गणेशोत्सवाला सुरुवात झालीये.

माघी गणेश चतुर्थी, विनायक चतुर्थी आणि मंगळवार असा दुर्मिळ योग आज आलाय. राज्यातील अनेक मंदिरे भाविकांनी फुलून गेलीत. भाद्रपद महिन्यातील गणोशोत्सवाप्रमाणे माघ महिन्यातही तितक्याच उत्साहाने घराघरात माघी गणेशोत्सव साजरा केला जातो.

गणेशोत्सवासाठी पुजेची वेळ आणि तिथी

दृकपंचागानुसार पुजेची वेळ आहे ११.२५ ते १३.४५ वाजेपर्यंत
तिथीची सुरुवात ३१ जानेवारी सकाळी ४.४३ ते १ फेब्रुवारी ३.४१ वाजेपर्यंत