मुंबई : आजपासून नवे वर्ष सुरु झालेय. त्यामुळे हे वर्ष आपल्याला कसे जाईल याची उत्सुकता सगळ्यांनाच असते. तुमच्या जन्मतारखेवरुन तुम्ही जाणून घेऊ शकता की तुमचे हे वर्ष कसे जाणार आहे ते. अंक ज्योति
मूलांक 1 - १, १०, १९, २८ ही जन्मतारीख असलेल्या व्यक्तींचा मूलांक १ असतो. ज्यांचा मूलांक 1 असतो त्यांचा स्वामी सूर्य असतो. यंदाचे वर्ष तुमच्यासाठी चांगले असणार आहे. ग्रहमान तुम्हाला चांगली साथ देईल. कामांमध्ये यश तसेच मानसन्मान मिळेल.
मूलांक 2 - ज्यांची जन्मतारीख 2, 11, 20, 29 असते त्यांचा मूलांक 2 असतो. यांचा स्वामी चंद्र असतो. हा मूलांक पाण्याचे प्रतिनिधित्व करतो तर सूर्य अंक अर्थात अग्नीचे आहे. पाणी आणि अग्नी यामुळे तुमच्या कार्यात अडथळा निर्माण करु शकतात. आरोग्याची काळजी घ्या.
मूलांक 3 - 3, 12, 21, 30 ही जन्मतारीख ज्यांची असते त्यांचा मूलांक 3 असतो. यांचा स्वामी गुरु असतो. या वर्षात तुम्हाला तुमच्या कार्यात यश मिळेल. भाग्योदयाचे संकेत आहेत.
मूलांक 4 - ज्यांची जन्मतारीख 4,13, 22, 31 असते त्यांचा मूलांक 4 असतो. यांचा स्वामी राहू असतो. गेल्या वर्षी ज्या कामांमध्ये अडथळे निर्माण झाले होते ते यावर्षी दूर होतील. मान-सन्मान प्राप्त होईल.
मूलांक 5 - 5,14,23 ही ज्यांची जन्मतारीख आहे त्यांचा मूलांक 5 आहे. यांचा स्वामी बुध आहे. वर्षांपासून केलेल्या मेहनतीचे फळ तुम्हाला या वर्षी चाखायला मिळेल. मान-सन्मान, यश, पुरस्कार मिळतील.
मूलांक 6 - ज्यांची जन्मतारीख 6,15,24 आहे त्यांचा मूलांक 6 असतो. यांचा स्वामी शुक्र असतो. कामाच्या ठिकाणी बदल होण्याची शक्यता आहे. जवळच्या व्यक्ती कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न करु शकतात.
मूलांक 7 - 7,16,25 ही जन्मतारीख असणाऱ्या व्यक्तींचा मूलांक 7 असतो. यांचा स्वामी केतु मानला जातो. जवळच्या व्यक्तींच्या आरोग्यावर लक्ष द्या. यात्रा तसेच व्यापारात नुकसान होण्याचा संभव. वाहन चालवताना काळजी घ्या.
मूलांक 8 - ज्यांची जन्मतारीख 8,17, 26 असते त्यांचा मूलांक 8 असतो. यांचा राशी शनी असतो. जीवनात चढ-उतार येत असतातच. त्यामुळे येणाऱ्या अडचणींना तोंड देत मार्ग काढाल. आरोग्याची काळजी घ्या.
मूलांक 9 - ज्यांची जन्मतारीख 9,18, 27 आहे त्यांचा मूलांक 9 आहे. यांचा स्वामी मंगळ असतो. फिटनेसबाबत जागरुक व्हाल. कामात यश मिळेल. नव्या कामाला सुरुवात कराल.