किचनमधील या गोष्टींवर जरुर ध्यान द्या

नात्यांमध्ये गोडवा कायम रहावा तसेच जीवनात सुख असावं यासाठी घरात सुख-समृद्धि असणे आवश्यक असते. घरात वास्तुदोष असतील अशांती निर्माण होते. किचनमध्येही काही नियमांचे पालन करणे गरजेचे यामुळे लक्ष्मी तुमच्यावर नेहमी प्रसन्न राहते.

Updated: Jan 1, 2016, 03:50 PM IST
किचनमधील या गोष्टींवर जरुर ध्यान द्या title=

मुंबई : नात्यांमध्ये गोडवा कायम रहावा तसेच जीवनात सुख असावं यासाठी घरात सुख-समृद्धि असणे आवश्यक असते. घरात वास्तुदोष असतील अशांती निर्माण होते. किचनमध्येही काही नियमांचे पालन करणे गरजेचे यामुळे लक्ष्मी तुमच्यावर नेहमी प्रसन्न राहते.

जेवणासाठीची गॅस शेगडी नेहमी अग्नि दिशेला असणे गरजेचे असते

जेवण बनवताना गृहिणीचे तोंड नेहमी पूर्व दिशेला असावे अथवा किचनमध्ये तुळस ठेवावी

गॅस सिलेंडर नेहमी दक्षिण दिशेला असावा. नाहीतर त्याची जागा पश्चिम दिशेला असावी.

जर तुमचे किचन दक्षिणेला आहे तर जेथे गृहिणी उभे राहून जेवण बनवते त्याच्यावर पिरॅमि़ड लावणे उत्तम

घरात बनवलेल्या जेवणाच्या भांड्यांना नेहमी उत्तर अथवा पूर्व दिशेला ठेवा

घरात देव्हारा असतान कामा नये. 

जेवण बनवून झाल्यानंतर जेवण कधीही गॅसवर ठेवू नका. यामुळे घरातून लक्ष्मी निघून जाते. 

जेवण बनवताना गृहिणींनी काळ्या अथवा लाल रंगाच्या चपलांचा वापर करु नये. 

किचनमध्ये खिडकी असल्यास ती जेवण बनवताना उघडी ठेवावी. यामुळे प्रकाशाचा वावर किचनमध्ये राहील.

नेहमी प्रसन्नतेने जेवण बनवले गेले पाहिजे. 

वॉशबेसिन गॅसजवळ बनवू नका.