मुंबई : जन्मवेळेनुसार जे अक्षर त्याच्या कुंडलीत येते त्यानुसार बाळाचे नामकरण केले जाते. तुमच्या नावाचा तुमच्या आयुष्यावर थोड्याफार प्रमाणात प्रभाव असतोच. तुमच्या नावाचे पहिले अक्षर तुमचा स्वभाव कसा आहे ते सांगते. तुमच्या नावाच्या अक्षरावरुन जाणून घ्या तुमचा स्वभाव.
A (ए) - A अद्याक्षरापासून नाव सुरु होणारे लोक मेहनती आणि धाडसी असतात. कठीण प्रसंगांचाही हे मोठ्या धैर्याने सामना करतात. यांना आपल्या प्रेमाचा दिखावा करायला आवडत नाही. पण, प्रेम आणि नाती जपणे त्यांना योग्य प्रकारे जमते. लपवाछपवी करुन बोलणे यांना आवडत नाही. थेट आणि सरळ बोलल्यास कोणत्याही कठीण प्रसंगांचा हे सामना करु शकतात. मात्र, यांना कोणत्याही कारणावरुन लगेच राग येतो.
B (बी) - B अक्षरापासून नाव सुरु होणारे व्यक्ती संकुचित स्वभावाच्या असतात. पण, आयुष्यात नेहमी नवीन मार्गांचा शोध घेणे यांना आवडते. यांच्ये आयुष्य काहीसे रहस्यमय असते. अशा व्यक्ती फार कमी लोकांशी मैत्री करतात. प्रेमाच्या बाबतीत यांच्या पदरी कधी कधी निराशा पडते.
C (सी) - नावात C अद्याक्षर असलेल्या व्यक्ती खूप यशस्वी असतात. दुसऱ्यांची सुख-दुखे: ते समजून घेतात. ते स्वभावाने भावनिक असतात.
D (डी) - ‘ऐकावे जनाचे करावे मनावे’ काहीसा अशा प्रकारचा स्वभाव या व्यक्तींचा असतो. कोणतेही काम या व्यक्ती मन लावून करतात. प्रेमाच्या बाबतीत ते काहीसे जिद्दी असतात. या लोकांना मिञांना पार्टी द्यायला आवडते.
E (ई) - E अक्षरापासून नाव सुरु होणारे फटकळ स्वभावाचे असतात. पण, यांच्या आयुष्यात सगळ्या गोष्टी त्यांच्या मनाप्रमाणे घडत असतात. यांचे मन चंचल असल्यामुळे प्रेमाच्या बाबतीत ते फार यशस्वी होत नाहीत.
F (एफ) - या व्यक्ती जबाबदार स्वभावाच्या असातात. यांना एकटं रहायला आवडत असून, ते खूप भावनिक असतात. यांचा आत्मविश्वास दांगडा असतो. आपल्या जोडीदाराला हे भरभरून प्रेम देतात.
G (जी) - या व्यक्ती निर्मळ स्वभावाच्या असून, दुसऱ्यांना मदत करण्यास. ते नेहमी तत्पर असतात. प्रेमाच्या बाबतीतही या व्यक्ती हळव्या असतात.
H (एच) - या व्यक्ती हसतमुख स्वभावाच्या असून त्यांचे मन निर्मळ असते. यांना एशोआरामात जीवन जगायला आवडते. प्रेमाच्या बाबतीतही हे काहीसे वेडे असतात.
I (आय) - I या अद्याक्षराचे लोक कलाकार प्रकारचे असता. यामुळेच ते नेमही जास्तीत जास्त लोकांना आपल्याकडे आकर्षीत करतात. प्रेमाच्या बाबतीत हे काही फार विशेष नसतात.
J (जे) - या व्यक्ती चंचल स्वभावाच्या असतात. सर्व गुण संपन्न अशा या व्यक्ती दिसायलाही सुंदर असतात. शिक्षणात हे थोडेसे मागे असले तरी, जबाबदाऱ्या पूर्ण करण्यात ते कमी पडत नाहीत. आपल्या जोडीदाराची साथ ते कधीही सोडत नाहीत.
K (के) - या व्यक्ती परफेक्शनिस्ट तसेच रोमँटीक असतात. पण, काहीशा स्वार्थीही असतात. ते आधी स्वत:चा नंतर जगाचा विचार करतात.
L (एल) - L अद्याक्षरापासून नाव सुरु होणाऱ्या व्यक्ती खूप उत्साही असतात. सगळ्यांसह ते प्रेमाणे वागतात. आपल्याच कल्पना विश्वात रमण्यात आणि कुटुंबासह रहायला त्यांना आवडते.
M (एम) - या व्यक्ती नेहमी मनं मारुन जगत असतात. यामुळे कधी कधी त्यांच्या जवळच्या व्यक्तींना याचा त्रास सहन करावा लागतो. तसेच त्यांनाही याचा त्रास होतो.
N (एन) - या व्यक्ती ओपन माईंडेड परंतु, तितकेच महत्वाकांक्षीही असतात. नाते संबध ते योग्य प्रकारे जपतात.
O (ओ) - या व्यक्ती काही बोलून दाखवण्यापेक्षा कृतीतून करुन दाखवतात. प्रेमाच्या बाबतीतही या व्यक्ती प्रामणिक असतात.
P (पी) - या अक्षाराने नाव सुरु होणाऱ्या व्यक्ती कायम तणावामध्येच गुरफटलेल्या असतात. मात्र, आपल्या जवळच्या व्यक्तीची सोबत ते कधीही सोडत नाहीत.
Q (क्यू) - या व्यक्ती फारशा महत्वकांक्षी नसतात. पण, त्यांचे नशीब त्यांना नेहमीच साथ देते. यामुळे त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. या व्यक्ती क्रिएटीव्ह असतात.
R (आर) - या व्यक्तींना आव्हानांचा सामना करायला आवडतो. यात ते यशस्वीही होतात. या व्यक्ति दुसऱ्याची टिंगलटवाळी करण्यात पटाईत असतात. माञ यांची टिंगलटवाळी केलेली यांना आवडत नाही.
S (एस) - एस नावाच्या व्यक्ती खूप मेहनती पण, थोडेसे बोलबच्चन असतात. मात्र, ते मनाने चांगले असतात. प्रेमाच्या बाबतीत हे लोक लाजाळू असले तरी तितकेच गंभीर असतात. हे लोक मनमिळाऊ व दुसऱ्याला मदत करणारे असतात
T (टी) - T अक्षरापासून नाव सुरु होणाऱ्या व्यक्ती उत्साही तसेच आनंदी स्वभावाच्या असतात. पैसा खर्च करताना हे बराच मागचा-पुढचा विचार करतात. यांच्या हातातुन पैसा लवकर सुटत नाही हे लोक विनाकारण सुट्टी काढत नाहीत आपल्या मनातील गोष्टी हे लवकर कोणाजवळ बोलत नाहीत.
U (यू) - एखाद्याचे मन कसे जिंकायचे यांची कसब या नावाच्या व्यक्तींना चांगले जमते. यांचे कोणतेही काम बिघडल्याशिवाय पूर्ण होत नाही.
V (व्ही) - या नावाच्या व्यक्तींचा स्वभाव मनमोकळा असला तरी कोणाच्याही बंधनाखाली राहून काम करायला यांना आवडत नाही. हे कधीही आपले प्रेम व्यक्त करत नाहीत. मैञी यांच्या कडुन शिकावी हे लोक मैञी साठी काहीही करतील.
W (डब्ल्यू) - या अक्षराने नाव सुरु होणाऱ्या व्यक्ती संकुचित वृत्तीच्या असतात. यांचा इगो खूप मोठा असल्याने नाते संबधामध्ये दुरावा तसेच तणावही निर्माण होतो. प्रेमाच्या बाबतीत कोणताही दिखावा करण्यास यांना आवडत नाही.
X (एक्स) - X अक्षरापासून नाव सुरु होणाऱ्या व्यक्ती थोड्या विक्षिप्त स्वभावाच्या असतात. प्रेमाच्या बाबतीत हे काहीसे मागेच असतात.
Y (वाय) - या अक्षरापासून नाव सुरु होणाऱ्या व्यक्ती राजेशाही स्वभावाच्या असतात. बघताक्षणीच ये समोरच्या व्यक्तीचा स्वभाव सांगतात. मात्र, यांना जास्त बोलायला आवडत नाही. प्रेमात आपल्या साथीदाराबाबतच्या अनेक गोष्टी ते विसरतात.
Z (झेड) - या अक्षराच्या व्यक्ती मनमिळावू स्वभावाच्या असून, यांचे राहणीमान साधे असते. आपल्या प्रेमापुढे हे कोणत्याही गोष्टीला जास्त महत्व देत नाहीत.