www.24taas.com, मुंबई
आयटम साँग या प्रकाराने सध्या सगळीकडे चांगलाच धुडगूस घातला आहे. सिनेमा हिट होवो न होवो, आयटम साँग हिट होतं. मात्र टीव्हीवर अशी आयटम साँग्स दाखवणं लवकरच बंद होण्याची शक्यता आहे.
येणाऱ्या प्रत्येक नव्या सिनेमात एक तरी आयटम साँग असतंच असतं. त्यात नाचणाऱ्या आयटम गर्ल्सनाही चांगलीच प्रसिद्धी मिळते.. हल्ली तर आघाडीच्या नट्याच आयटम साँग्स करतात आणि प्रसिद्धी मिळवतात. मात्र यातील बरीच आयटम साँग्स ही अश्लील, द्व्यर्थी असतात. त्यातील अंगप्रदर्शन आणि हिडिस नृत्य यामुळे सवंग प्रसिद्धी मिळत असली, तरी टीव्हीवर लहान मुलांवर अशा गाण्यांचे वाईट परिणाम होऊ शकतात. हिच गोष्ट लक्षात घेत सेंट्रल बोर्डाने अशा गाण्यांना ऍडल्ट रेटिंग देत ही गाणी टीव्हीवर न दाखवण्याची सूचना जारी केली आहे. सर्व प्रादेशिक कार्यालयांना यासंदर्भात सूचना दिल्या आहेत. टीव्हीवर केवळ A/U सर्टिफिकेट असलेल्या गोष्टी प्रसारीत करू शकत असल्यामुळे आयटम साँग्स यापुढे टीव्हीवर दाखवली जाणारी नाहीत.
सेंसॉर बोर्डाच्या सीईओ पंकजा ठाकूर यांनी ही सिनेमातील अश्लीलतेवर बंधनं घालण्यासंदर्भात उचललेली पहिली पायरी असल्याचं म्हटलं आहे. याशिवाय महिलांसंदर्भातील हिंसा, अश्लील संवाद असणारे सिनेमेही टीव्हीवर दाखवण्यास बंदी घातली जाणार आहे.