`शातीर` बदलणार 'सिरीयल किसर`ची ओळख ?

बॉलिवूडचा ‘सिरीयल किसर’ म्हणून ओळखळ्या जाणाऱ्या इम्रान हाश्मीनं लग्नानंतर मात्र किसिंग सीन्स द्यायला आढेवेढे घ्यायला सुरुवात केली.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jan 14, 2014, 05:50 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
बॉलिवूडचा ‘सिरीयल किसर’ म्हणून ओळखळ्या जाणाऱ्या इम्रान हाश्मीनं लग्नानंतर मात्र किसिंग सीन्स द्यायला आढेवेढे घ्यायला सुरुवात केली. पण, यानंतर बॉलिवूडमध्ये आपला ठसा कायम राहावा, यासाठी मात्र त्याला चांगलीच मेहनत घ्यावी लागतेय. इम्रान सध्या नृत्याचे धडे गिरवतोय.
‘सीरीयल किसर’ ही आपली ओळख पुसून इम्रानला आता नवं काही तरी ट्राय करण्याची इच्छा आहे. लवकरच त्याचा ‘शातीर’ हा सिनेमा प्रेक्षकांसमोर हजर होणार आहे. याच चित्रपटातील एका गाण्यावरच्या नृत्यासाठी इम्रानची दमछाक होतेय. पण, तो मात्र हा डान्स शिकून घेण्यासाठी विशेष मेहनत घेताना दिसतोय.
‘शातीर’ या चित्रपटाचं दिग्दर्शन कुणाल देशमुख करीत आहे. `डान्सिंग स्टेप्स`मधून इम्रान हाश्मीहचे व्यक्तिमत्त्व दिसावे, यासाठी कुणालचाही प्रयत्न सुरू आहे. या चित्रपटातील नृत्यदिग्दर्शन राजू खान करीत आहे. इम्रानचा हा परफॉर्मन्स प्रेक्षकांसाठी वेगळा आणि खास असेल असा विश्वास राजूलाही आहे. या गाण्यानंतर प्रेक्षकांसमोर इम्रानची वेगळी इमेज दिसून येईल, असा प्रयत्न सगळेच करत आहेत.
‘यु टीव्ही मोशन पिक्च र्स’च्या वतीनं या चित्रपटाची निर्मिती करण्यात येतेय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.