`विश्वरूपम` मुस्लिम विरोधी?

डीटीएच प्लॅटफॉर्मवरून आपला नवा सिनेमा ‘विश्वरुपम’ रिलीज करणाऱ्या कमल हासनचा नवा सिनेमा मुस्लिम विरोधी असल्याचं म्हटलं जात आहे. यावर कमल हासनने स्पष्टीकरण देताना हा सिनेमा मुस्लिमविरोधी नसल्याचं म्हटलं आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jan 6, 2013, 07:45 PM IST

www.24taas.com, चेन्नई
डीटीएच प्लॅटफॉर्मवरून आपला नवा सिनेमा ‘विश्वरुपम’ रिलीज करणाऱ्या कमल हासनचा नवा सिनेमा मुस्लिम विरोधी असल्याचं म्हटलं जात आहे. यावर कमल हासनने स्पष्टीकरण देताना हा सिनेमा मुस्लिमविरोधी नसल्याचं म्हटलं आहे.
‘विश्वरूपम’ या सिनेमात मुसलमान समाजाचं चुकीचं दर्शन घडवलं गेलं असल्याची तक्रार सगळीकडून होऊ लागली आहे. मात्र यावर बोलताना कमल हासन यांनी स्पष्ट केलं, की जगभरातले मुसलमान हा सिनेमा पाहून खूष होतील, आणि मला पुढच्या ईदला मला बिर्याणी पाठवतील.
‘विश्वरूपम’ हा डीटीएचवर रिलीज होणारा पहिलाच भारतीय सिनेमा आहे. हा सिनेमा थिएटरमध्ये रिलीज होण्यापूर्वीच डीटीएचवर १००० रुपये भरून पाहाता येऊ शकतो. या सिनेमात कमल हासनसोबत अँड्र्यू जेरेमिया, शेखर कपूर आणि राहूल बोस यांनी अभिनय केला आहे.