www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
अभिनेता कमाल राशिद खान (केआरके) याच्या विरोधात डॉ. भीमराव आंबेडकर विचारमंच या संस्थेतर्फे वंशद्वेषी टीका केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आक्षेपार्ह आणि जातीयवादी विधान केल्यासंबंधी त्याच्यावर पोलीस कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
‘रांझणा’ या सिनेमावर आपलं मत मांडताना सिनेमातील प्रमुख अभिनेता धनुष याच्या दिसण्याबद्दल केआरकेने केलेलं विधान वंशद्वेषी असल्याचं ‘डॉ. भीमराव आंबेडकर विचारमंच’चं म्हणणं आहे. युट्यूबवर केआरकेचं विधान पाहिल्यानंतर त्याच्याविरोधात कारवाईची मागणी केली गेली आहे. दिल्लीच्या ‘सीमा पुरी’ पोलीस ठाण्यात केआरके विरोधात तक्रार करण्यात आली आहे. कलम ६६ अ नुसार खान याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
‘रांझणा’ सिनेमातील प्रमुख अभिनेता ‘धनुष’ याच्या दिसण्यावरून कमाल राशिद खानने केलेली टीका ही वंशद्वेषी असल्याचं ‘डॉ. भीमराव आंबेडकर विचारमंच’च्या श्री. काणे यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात पोलीस आयुक्तांकडे तक्रार केल्यावर कमाल राशिद खानविरोधात पुरावे गोळा करण्याचे आदेश पोलिसांना मिळाले आहेत. या प्रकरणी २९ जुलैच्या युट्युब वरील ८ मिनिटांच्या क्लिपमधील कमाल राशिद खानचं वक्तव्य गृहित धरण्यात येईल. केआरकेला या प्रकरणी अटकही होऊ शकते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.