www.24taas.com,झी मीडिया, अहमदाबाद
अहमदाबादमधील एका स्थानिक न्यायालयाने बिग बी अमिताभ बच्चनसह कौन बनेगा करोडपतीचा निर्माता याला नोटीस पाठीवली आहे. कौन बनेगा करोडपतीच्या सातव्या सिझनमध्ये अपमानजक पद्धतीने प्रोमोज सादर केल्याप्रकरणी ही नोटीस बजावण्यात आली आहे.
सोनी टिव्हीवर ‘कौन बनेगा कोरडपती’ हा कार्यक्रम सादर केला गेला आहे. आता सातवा सिजन सुरू होणार आहे. या कार्यक्रमाचा प्रोमोज दाखविण्यात येत आहे. मात्र, हा प्रोमोज अपमानजक पद्धतीने सादर केला गेला आहे, असा दावा एका याचिकाकर्त्यांने केला आहे. त्यानुसार ही नोटीस मुख्य जिल्हा न्यायाधिक एस व्ही पारेख यांनी बजावली आहे. ही नोटीस १ ऑगस्टला पाठविण्यात आलेय.
बिग बी आणि निर्मात्याने या नोटीशीला २१ ऑगस्टपर्यंत उत्तर देण्याचे सांगण्यात आले आहे. देवेंद्र सिंग यांनी केबीसी प्रमोजविरोधात ही याचिका दाखल केली आहे. त्यानुसार निर्माता सिद्धार्थ बसू, सादरकर्ते अमिताभ बच्चन आणि या कार्यक्रमासंबंधीत अन्य पाच लोकांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
याचिकाकर्त्यांने प्रोमोजची टेप आणि कॉम्पॅक्ट डिस्क (सीडी) न्यायालयात सादर केली आहे. या प्रोमोजमध्ये वकिलांवर चित्रण केले गेले आहे. ते चुकीच्या पद्धतीने दाखविण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.