`खैरलांजीच्या माथ्यावर` वादाच्या भोवऱ्यात

महाराष्ट्रातील संवेदनशील विषयावरील चित्रपटावर आधारीत चित्रपट `खैरलांजीच्या माथ्यावर` प्रदर्शनापूर्वी वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. ज्यांच्या आयुष्यातील घटनेवर आधारीत हा चित्रपट आहे. त्या भय्यालाल भोतमांगे यांनीच चित्रपटावर आक्षेप घेतलेला आहे.

Updated: Feb 4, 2014, 01:47 PM IST

www.24taas.com , वृत्तसंस्था , नागपूर
महाराष्ट्रातील संवेदनशील विषयावरील चित्रपटावर आधारीत चित्रपट `खैरलांजीच्या माथ्यावर` प्रदर्शनापूर्वी वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. ज्यांच्या आयुष्यातील घटनेवर आधारीत हा चित्रपट आहे. त्या भय्यालाल भोतमांगे यांनीच चित्रपटावर आक्षेप घेतलेला आहे.
आपल्या आयुष्यातील घटनेवर चित्रपट बनवताना आपल्याला विश्वासात घेतले नाही, असं मत भय्यालाल यांनी व्यक्त केलंय.
चित्रपटात भय्यालाल भोतमांगे यांना दारूचे व्यसन असून कायमच भयभित असल्याचे दाखवण्यात आल्याने भय्यालाल यांनी आक्षेप घेतला आहे. तसेच भय्यालाल भोतमांगे यांच्या मुलींच्या प्रतिमा मलिन करण्यात आल्याने भय्यालाल न्यायालयात जाणार असल्याचे समजते.
भय्यालाल भोतमांगे आणि यांच्या मुलींच्या व्यक्तीरेखा अवास्तवपणे दाखवून चित्रपटाला वास्तववादी कसा म्हणता येईल? त्यामुळे या चित्रपटाच्या नावापुढील वास्तववादी घटना हा उल्लेख काढून टाकावा, असे मत भय्यालाल भोतमांगे यांनी व्यक्त केलं.
खैरलांजीच्या माथ्यावर हा चित्रपट ७ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. चित्रपटातील काही भाग वगळण्यात यावा अशी मागणी भय्यालाल भोतमांगे यांनी केली आहे.
या प्रकरणी लवकर निर्णय घेण्यात यावा अशी मागणी अ.भा. धम्मसेनातर्फे करण्यात आली आहे. त्यासाठी अ.भा. धम्मसेनेकडून सेंसॉर बोर्डाच्या कार्यालयापुढे आंदोलन करण्यात येणार आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.