रिव्ह्यूः डी डे सर्वांना आवडे

सध्या बॉलीवूडच्या चित्रपटांमध्ये भरपूर विषय वैविध्य दिसून येतेय. निखिल अडवाणी यांचा डी-डे हा चित्रपट आज रिलीज झालाय. एक था टायगर, एजंट विनोदनंतर एजंटवर आधारित बॉलीवूडचा हा नवा डी-डे.

Updated: Jul 19, 2013, 05:28 PM IST

www.24taas.com,झी मीडिया,मुंबई
सध्या बॉलीवूडच्या चित्रपटांमध्ये भरपूर विषय वैविध्य दिसून येतेय. निखिल अडवाणी यांचा डी-डे हा चित्रपट आज रिलीज झालाय. एक था टायगर, एजंट विनोदनंतर एजंटवर आधारित बॉलीवूडचा हा नवा डी-डे. सस्पेंस, थ्रीलर, रोमान्स यांनी भरलेला असा हा चित्रपट आहे. भारतीय एजंट एका डॉनला पकडण्याच्या मोहिमेवर जातात आणि त्यात ते कसे यशस्वी होतात या सर्वांचे चित्रीकरण या चित्रपटात केले आहे.
कथानक
इक्बाल (ऋषी कपूर) हा कुप्रसिद्ध डॉन आहे. तो भारताच्या महत्त्वाच्या लिस्टमध्ये पहिल्या नंबरवर आहे. जो पाकिस्तानात लपून बसलाय. भारताची इंटिलिजन्स टीम या गोल्डमॅनला पकडण्यासाठी एक मिशन बनवते. यासाठी दोन माणसे भारतातून पाठवली जातात. दोन माणसे आधीच पाकिस्तानात राहत आहेत. जोया रहमान (हुमा कुरैशी) आणि रूद्र प्रताप सिंग (अर्जुन रामपाल) या दोघांना या मिशनसाठी भारतातून पाकिस्तानात पाठवले जाते. रूद्र प्रताप सिंग रॉ एजंट आहे आणि जोया रहमान बॉम्ब डिफ्यूजरचे काम करते. वली खान (इरफान खान) आणि असलम (आकाश दहिया) हे दोघे पाकिस्तानातच आहेत. वली खान(इरफान खान) गेल्या ९ वर्षांपासून पाकिस्तानात राहतोय. त्याला एका मिशनसाठी भारतातून पाकिस्तानात पाठवण्यात येतं. तो एक रॉ एजंट आहे. वली खानची पत्नी स्वरा आहे आणि त्याला एक मुलगा आहे. वली खानला योजलेल्या मिशनप्रमाणे भारताच्या मोस्ट वाँटेड ड़ॉनला पाकिस्तानातून शोधून भारतात आणायचे आहे.
चारही जण खूप इमानदारीने हे मिशन पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. पण काही कारणांमुळे त्याचा प्रयत्न फसतो आणि मिशन फेल होते. परंतु या अपयशाने खचून न जाता ते पुन्हा नव्या जोमाने मिशनसाठी कामाला लागतात आणि अखेर त्यांचे मिशन पूर्णत्वास पोहोचते. चारही जण डॉनला भारतात जिवंत पकडून आणण्यात यशस्वी होतात. पण हे मिशन पूर्ण करण्यासाठी त्यांना बरीच प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. बऱ्याच गोष्टींचा त्यागही करावा लागतो.
दिग्दर्शन
निखिल अडवाणी यांनी या चित्रपटात अॅक्श, थ्रीलर, इमोशन आणि प्रेम यासर्वांचा एकत्रित चांगला मेळ घातलाय. सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत चित्रपटात सस्पेन्स कायम राहतो. आता शेवट काय होणार ही उत्सुकताच प्रेक्षकांना शेवटपर्यंत चित्रपट बघण्यासाठी खिळवून ठेवते. निखिल अडवाणी याने या चित्रपटात भावनांशी खेळण्याचा पूर्ण प्रयत्न केलाय आणि बऱ्याच प्रमाणात तो यशस्वीही झालाय.चित्रपटाचे संवाद उत्तम आहेत.
अभिनय
डीडेमध्ये इरफान खान, अर्जुन रामपाल, श्रुति हसन, स्वरा, ऋषी कपूर यांचा उत्तम अभिनय आहे. लोकांना नक्कीच यांचा अभिनय आवडेल. इरफान खान आणि ऋषी कपूर यांचा अभिनय वाखाणण्याजोगा आहे. दोघांनी इतक्या सुंदर रितीने काम केलयं ज्यामुळे प्रेक्षक नक्कीच बोअर होणार नाही. हुमा कुरेशीचा अभिनय जास्त प्रभावी दिसत नाही. तर आकाशचा अभिनयाने एक वेगळीच छाप सोडलीय.

संगीत
शंकर, एहसान, लॉय यांचे संगीत या चित्रपटाला लाभले आहे. चित्रपटाच्या प्रसंगाशी समरस अशी यातील गाणी आहेत.

चित्रपट का पाहावा?
देशासाठी आपले जीवन धोक्यात घालणाऱ्या रॉ एजंट यांचे जीवन जवळून पाहायचे असेल तर जरुर पाहा. तसेच ऋषी कपूर आणि इरफानचा उत्तम अभिनय तुम्हाला या चित्रपटातून पाहायला मिळेल.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.