www.24taas.com, झी मीडिया नवी दिल्ली
आपल्या रोमान्टिक लाईफबद्दल दीपिकानं पहिल्यांदाच जाहीर चर्चा केलीय. ती जरी मॉडर्न असली तरी तिचे प्रेमाबद्दलचे विचार मात्र पारंपरिकच आहेत, असं आम्ही नाही तर तिनंच म्हटलंय. सध्या रामलीला सिनेमातील दीपिका- रणवीर सिंह या जोडीतील केमिस्ट्री कॉलेज कट्ट्यावरचा हॉट विषय बनलाय.
विल्यम शेक्सपिअर लिखित अमर प्रेमकथा म्हणून नावलौकिक असलेल्या ‘रोमियो अॅन्ड जूलिएट’वर आधारीत ‘रामलीला’ या सिनेमात २७ वर्षीय अभिनेत्री दीपिका बिन्धास्त आणि स्वतंत्र विचारांच्या एका मुलीची भूमिका साकारतेय.
दीपिकाच्या म्हणण्यानुसार, ‘मी प्रेमाच्या जुन्याच पद्धतींवर विश्वास ठेवते. हे प्रेम मी माझे आई-वडील आणि माझ्या कुटुंबासोबत मोठं होताना अनुभवलं आहे. प्रेम, लग्न आणि नात्यांच्या बाबतीत मी खूप परंपरागत विचारांची आहे. याचं कारण म्हणजे मला अन्य कोणतीच पद्धत ठाउक नाही’.
‘रामलीला’च्या निमित्तानं संजय लीला भन्साळीसोबत दीपिका पहिल्यांदाच काम करतेय. ‘ही माझ्या आत्तापर्यंतच्या करिअरमधील सर्वात कठीण भूमिका आहे. कारण, या सिनेमाच्या शुटिंगवर कोऱ्या पाटिसारखी जात असे आणि तिथे भन्साळी मला सिनेमानुसार आणि कथेनुसार घडवत असे. त्यामुळे खूप भीतीही वाटत होती... कारण, आपला दिवस कसा जाणार हे ठाऊकच नसायचं’, अशी कबुलीही दीपिकानं दिलीय.
‘रामलीला’मध्ये उत्तम नृत्य करणारी म्हणते, ‘सिनेमाचं औपचारिक शिक्षण मी घेतलेलं नाहीए... निश्चितच हे वर्ष थकवणार होतं. मी ये जवानी है दिवानी, चेन्नई एक्सप्रेस आणि रामलीला या सिनेमांसाठी काम केलं, परंतु या सिनेमांचे निकाल चांगले आहेत आणि यासाठी मी खूश आहे’.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.