www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
सुप्रिम कोर्टानं सहावर्षांपूर्वीच्या मारहार प्रकरणी अभिनेता गोविंदाकडून जवाब मागितलाय. २००८मध्ये गोविंदाच्या एका चाहत्यानं गोविंदानं आपल्याला मारल्याचा आरोप केला होता.
संतोष रे नावाच्या या व्यक्तीनं सांगितलं होतं, की चित्रपट ‘मनी है तो हनी है’च्या सेटवर गोविंदानं त्याला खूप जोरानं थोबाडीत मारली होती. या विरोधात संतोषनं गोविंदाला मुंबई हायकोर्टात खेचलं. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात पुरावे नसल्याच्या कारणावरुन गोविंदाची या प्रकरणी निर्दोष मुक्तता करण्यात आली.
मात्र संतोषनं या निर्णयाविरोधात सुप्रिम कोर्टात धाव घेतलीय. ज्यानंतर गोविंदाकडून आता जबाब मागवण्यात आलाय.
संतोष म्हणतात, “मी मुंबईत अभिनेता व्हायला आलो होतो, मात्र या एका थापडीनं मला देशोधडीला लावलं. मी या केसवर आतापर्यंत लाखो रुपये खर्च केलेले आहेत.”
याबाबत गोविंदानं म्हटलंय की, “मला अजून कोणतीही नोटीस मिळाली नाहीय. हायकोर्टानं जिथं हे प्रकरण रद्द केलंय. तेव्हा माहित नाही आता या माणसाला काय हवंय. मला जर वाटलं असतं तर मी त्याच्यावर बदनामीची केसही टाकू शकलो असतो”.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.